Home /News /maharashtra /

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक बळी, साताऱ्यात 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक बळी, साताऱ्यात 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

14 दिवसांपूर्वी संबंधित व्यक्तीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

    सातारा, 6 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना साताऱ्यात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियावरुन आलेल्या 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला. 14 दिवसांपूर्वी संबंधित व्यक्तीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. साताऱ्यात मृत्यू झालेल्या रुग्णाचे 14 व्या दिवशीचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या व्यक्तीचा मृत्यू नेमाक कशामुळे झाला याबाबत जिल्हा प्रशासनाने अजून अधिकृत घोषणा केली नाही. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरस रूग्ण वाढत आहेत, याबाबत आजच्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. कोरोना व्हायरस प्रतिबंध करण्यासंदर्भात राज्यात वरिष्ठ अधिकारी समिती गठीत केली गेली आहे, त्यांच्याशी आरोग्यमंत्री सल्लामसलत करणार आहेत सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी (दिनांक 5.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची ) 1. एकूण दाखल - 183 2. जिल्हा शासकीय रुग्णालय- 86 3. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 95 4. खाजगी हॉस्पीटल- 2 5. कोरोना नमुने घेतलेले- 185 6. कोरोना बाधित अहवाल - 4 7. कोरोना अबाधित अहवाल - 168 8. अहवाल प्रलंबित - 11 9. डिस्चार्ज दिलेले- 168 10. सद्यस्थितीत दाखल- 15 11. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 3.4.2020) - 649 12. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 649 13. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 491 14. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पर्ण न झालेल्या व्यक्ती – 158 15. संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 60 16. आज दाखल 2 17. यापैकी डिस्जार्ज केलेले- 30 18. यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0 19. अद्याप दाखल - 30

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या