भरधाव कार झाडावर आदळली, 3 चिमुरड्यासह 5 ठार

भरधाव कार झाडावर आदळली, 3 चिमुरड्यासह 5 ठार

साताऱ्यात पुणे-पंढरपूर महामार्गावर कारचा ताबा सुटल्यामुळे भीषण अपघात झालाय. या अपघातात 5 जण ठार झाले तर 4 जण जखमी झाले आहे.

  • Share this:

सातारा, 27 एप्रिल : बरड तालुका फलटण येथे पुणे-पंढरपूर मार्गावर बरडजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन अल्पवयीन मुलांसह दोन महिला जागीच ठार झाल्या एकूण पाच जण अपघातात ठार झाले असून दोघे गंभीर जखमी आणि दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गाडीतील व्यक्ती या देहूरोड (आळंदी) पुणे येथील असून सोलापूरहून पुणेच्या दिशेने चाललेली असेंट कार क्र. एमएच 14 बीसी-9480 ही चारचाकी आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान बरड गावच्या हद्दीमध्ये आल्यानंतर भरदाव वेगात असलेल्या गाडीचा चालकाचा ताबा सुटून ती कार रस्त्यालगत असणाऱ्या झाडाला जोरदार धडकली. या गाडीमध्ये सुमारे नऊ प्रवासी प्रवास करीत होते.

ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीचे इंजिन ड्रायव्हरसीटपर्यंत मागे आले होते. अपघातामध्ये तीन अल्पवयीन मुलांसह दोन महिला जागीच ठार झाल्या असून एकूण पाच जण अपघातात ठार झाले असून असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती गंभीर असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना खाजगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अधिक लोक प्रवास करीत असल्याने या वाहनांचा वेग वाढून हा अपघात झाल्याचे निदर्शनास येत आहे.

याबाबत अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड करीत आहेत.

First published: April 27, 2018, 6:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading