उदयनराजेंच्या गडाला सुरुंग लागणार? 'या' कारणामुळे वाढली डोकेदुखी

उदयनराजेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीसोबत मतदान पार पडलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 04:04 PM IST

उदयनराजेंच्या गडाला सुरुंग लागणार? 'या' कारणामुळे वाढली डोकेदुखी

मुंबई, 22 ऑक्टोबर : उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीसोबत मतदान पार पडलं आहे.

यंदाची निवडणूक उदयनराजे भोसले यांच्यासाठी आव्हानात्मक असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यातच आता मतदानाची टक्केवारी समोर आल्यानंतर उदयनराजेंची डोकेदुखी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात 60 टक्के मतदान झालं होतं. मात्र आता पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी जवळपास 65 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

साताऱ्यातील हे वाढलेलं मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात पडणार, यावर जय-पराजयाचं गणित ठरणार आहे. मात्र जेव्हा-जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो, तेव्हा हा वाढीव टक्का हा प्रस्थापित उमेदवारासाठी धोक्याची घंटा असल्याचं समजलं जातं. त्यामुळे वाढलेलं मतदान गेल्या तीन टर्मपासून सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार असलेल्या उदयनराजे यांच्या अडचणी वाढवणार का, अशी चर्चा रंगत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. यामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यातील दोन्ही राजेंनी भाजप प्रवेश केला होता. यात शिवेंद्रसिह हे विधानसभा निवडणूक लढवत होते. तर उदयनराजे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून खासदार झाले होते. त्यांनी राजीनामा दिल्यानं इथं लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली होती.

अखेरच्या टप्प्यात शरद पवार यांची साताऱ्यातील सभा वादळी ठरली होती. लोकसभेला चूक केली आता ती सुधारत आहे असं म्हणत शरद पवार यांनी भावनिक साद घातली होती. विधानसभेसाठी शिवेंद्रराजेंविरुद्ध राष्ट्रवादीने दीपक पवार यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला असला तरी साताऱ्यातील जनता राजघराण्याच्या पाठिशी राहिल्याने काँग्रेस राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक जड जाणार होती. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत या जागेवर अटीतटीची लढत झाल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. त्यामुळे राजे बाजी मारणार की राष्ट्रवादी गड राखणार हे 24 तारखेलाच स्पष्ट होईल.

Loading...

VIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...