मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्रातील आणखी एक भाजप आमदारावर अटकेची टांगती तलवार, कधीही अटक होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील आणखी एक भाजप आमदारावर अटकेची टांगती तलवार, कधीही अटक होण्याची शक्यता

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही भाजप नेते अडचणीत येताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही भाजप नेते अडचणीत येताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही भाजप नेते अडचणीत येताना दिसत आहेत.

    सातारा, 6 मे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही भाजप नेते अडचणीत येताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यापासून ते साताऱ्याचे आमदार जयकुमार गोरे असे अनेक आमदार अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे जयकुमार गोरे यांचा कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तर भाजप आमदार गणेश नाईक यांना नुकतंच अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. त्यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. तर जयकुमार गोरे यांना कधीही अटक होण्याची दाट शक्यता आहे. साताऱ्यातील मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासंदर्भात आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून आज यावर सुनावणी झाली. यामध्ये जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज वडूज न्यायालयाने फेटाळला असल्याने जयकुमार गोरे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. जयकुमार गोरे यांच्यावर नेमका आरोप काय? महादेव पिराजी भिसे यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. मायणी येथील छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशनच्या जागेत जाण्यासाठी गट नंबर 769 मधील अल्पभूधारक शेतकरी, जो मयत आहे, त्याला जीवंत दाखवून जमिनीचा दस्तावेज केला गेला. त्यातून अल्पभूधारक कुटुंबाची फसवणूक केली गेली, असा आरोप जयकुमार गोरेंवर आहे. (रावसाहेब दानवे ते यशोमती ठाकूर, केंद्रीय मंत्री ते आमदार-खासदार, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींवर वीजबिलाची लाखोंची थकबाकी) याप्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह 5 जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीला जीवंत दाखवत जमिनीचा दस्तऐवज केल्याचा आरोप गोरेंवर आहे. या प्रकरणी साताऱ्यातील दहिवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश नाईकांना जामीन मंजूर भारतीय जनता पक्षाचे (BJP MLA Ganesh Naik) ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांना दिलासा मिळाला आहे. गणेश नाईक यांना जामीन मंजूर (Granted bail) करण्यात आला आहे. बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल झाल्यानंतर गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश नाईक यांना अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना मंजूर केला. यावेळी त्यांना तपास कामात पोलिसांना सहकार्य करायचं आणि बाहेर जाण्याआधी पोलिसांना कळवायचे अशा सूचना न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या