रविवारच्या सुट्टीचा आनंद लुटताना 12 वीच्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला

रविवारच्या सुट्टीचा आनंद लुटताना 12 वीच्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला

कुणाल वाणी असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो साताऱ्यातील सैनिक स्कूल येथे 12 वीत शिक्षण घेत होता.

  • Share this:

किरण मोहिते, सातारा, 23 फेब्रुवारी : सातारा शहरातील सैनिक स्कूलमधील स्वीमिंग पूलमध्ये बारावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. हा प्रकार रविवारी दुपारच्या सुमारास घडला. कुणाल वाणी असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो साताऱ्यातील सैनिक स्कूल येथे 12 वीत शिक्षण घेत होता.

रविवारी सुट्टी असल्याने 10 ते 15 मुले पोहण्यासाठी गेली असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. कुणाल हा नाशिकचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. उद्यापासून कुणालच्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार होती. मात्र त्याआधी आज सुट्टीचा दिवस असल्याने काही काळ पोहण्यासाठी म्हणून कुणाल आपल्या इतर मित्रांसोबत तलावाकडे गेला.

सर्व मुलं तलावात पोहोत असताना कुणालवर मात्र काळाने घाला घातला. कुणालला पोहता येत होतं का? तो नेमका कशामुळे तलावात बुडाला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र 12 वीची परीक्षा देण्याची तयार करणाऱ्या कुणालवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दुकान फोडून तब्बल पावणेदोन लाखांचे मोबाईल लंपास

दरम्यान, सैनिक स्कूल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे पालकांच्या या आरोपाला सैनिक स्कूल प्रशासन काय उत्तर देणार, हे पाहावं लागेल. याप्रकरणी अधिक तपास सातारा शहर पोलीस करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: satara
First Published: Feb 23, 2020 10:11 PM IST

ताज्या बातम्या