सातारा, 25 एप्रिल: आज संपूर्ण देश कोरोनाशी (Coronavirus in India) लढत आहे. मृत्यूचा आकडाही वाढणारा आहे. सर्वत्र अशी तणावाची परिस्थिती असतानाच साताऱ्यामधून अपघाती (Satara Accident) मृत्यूची बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील जावळी तालुक्यात हा भीषण अपघात घडला आहे. जावली तालुक्यातील मेरुलिंग घाटात इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला असून त्यात गाडीचा पार चक्काचूर झाला आहे. घाटातील वळणामध्ये अंदाज न आल्याने ही गाडी दरीत कोसळली आणि त्यात तिघांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या भीषण अपघातात 3 जण ठार तर 5 जण जखमी (3 died and 5 people are injured in road accident) झाले आहे. अशी माहिती समोर येते आहे की, रेशनिंग आणण्यासाठी जात असताना मेरुलिंग घाटातील एका वळणाचा अंदाज न आल्याने गाडी पलटी झाली, त्यातच ही दुर्घटना घडली आहे.
या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मेढा याठिकाणी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेशन आणण्यासाठी जाताना हा अपघात झाल्याची माहिती आहे, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Road accident, Satara