साताऱ्यात मुलीची निर्घृण हत्या, शीर धडावेगळं करून शेतात टाकलं

साताऱ्यात मुलीची निर्घृण हत्या, शीर धडावेगळं करून शेतात टाकलं

भाग्यश्री माने या 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची मंगळवारी हत्या करण्यात आली.

  • Share this:

सातारा, 23 जानेवारी : महाविद्यालयीन युवतीचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. साताऱ्यातील करपेवाडी गावातील ही धक्कादायक घटना घडली आहे. भाग्यश्री माने असं खून झालेल्या मुलीचं नाव आहे.

भाग्यश्री माने या 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची मंगळवारी हत्या करण्यात आली. आरोपीनी नराधमाने भाग्यश्रीचा गळा चिरून शीर धडावेगळं केलं आणि तिचा मृतदेह उसाची शेत असणाऱ्या बाधांवर फेकून दिला. या क्रूर हत्याकांडाने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

भाग्यश्रीची हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली याबाबत अजून माहिती मिळाली नाही. हत्येची घटना समोर आल्यानंतर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत आरोपींचा शोध लागू शकलेला नाही. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, महाविद्यालयीन युवतीची इतक्या क्रूरपणे केलेल्या हत्येची घटना माहिती समोर आल्यानंतर करपेवाडी गावात संताप पसरला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी भाग्यश्रीचे नातेवाईक करत आहेत.

VIDEO : खून करायचा का माझा? जयंत पाटलांसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची

First published: January 23, 2019, 9:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading