'आधार कार्ड'च्या मोबदल्यात सरपंचाने केली शरीरसुखाची मागणी

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर गावातल्या लोकांनी शैलेश राऊतला पकडून चोप दिला आणि याची रामकेट पोलिसात तक्रारही दिली.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 09:28 PM IST

'आधार कार्ड'च्या मोबदल्यात सरपंचाने केली शरीरसुखाची मागणी

नागपूर 28 जून : आधार कार्ड बनवून देतो असं आश्वासन देत एका असाहाय महिलेकडे सरपंचाने शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादाय प्रकार नागपूर जिल्ह्यात घडलाय. रामटेक तालुक्यातील काचुरवाही गावातली ही घटना आहे. महिला आणि सरपंच शैलेश राऊत यांच्यातल्या बोलण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. हे बोलणं व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांनी राऊतला चोप दिला तर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

शैलेश राऊत हा काचुरवाहीत सरपंच आहे. याच गावात एका महिलेचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण सुरू होतं. शैलेश हा त्यांच्या ओळखीचा असल्याने त्याने त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा बहाना करत महिलेशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. शैलेश तिला आधारकार्ड आणि रेशन कार्ड बनवून घे असा सल्ला देत होता.

आधार आणि रेशन कार्ड बनवलं तर तू त्याच्या संपत्तीची अर्धी मालकीन होशील असंही त्याने तिला सांगितलं. मात्र याच्या बदल्यात तुला मी सांगतो ते द्यावं लागेल असंही तो तिला म्हणतो. नवऱ्याच्या फोनवरून फोन करत जाऊ नको असंही त्याने तिला सांगितलं. एकदा आधारकार्ड तयार झालं की तुला काळजीचं कारण नाही. मी पैसे देऊन ते कार्ड तयार करून देतो असंही त्याने त्या महिलेला सांगितलं.

ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर गावातल्या लोकांनी शैलेश राऊतला पकडून चोप दिला आणि रामकेट पोलिसात तक्रारही दिली. पोलिसांनी शैलेश विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणानंतर आता शैलेश राऊतचं सरपंचपदही जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 09:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...