विरोधात बातमी लावली म्हणून सरपंचाने केली पत्रकाराला जबर मारहाण

विरोधात बातमी लावली म्हणून सरपंचाने केली पत्रकाराला जबर मारहाण

विरोधात बातमी छापली असल्याचा राग मनात धरून सरपंचाने एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला जबर मारहाण केल्याची घटना बागलाणच्या आंबसन येथे घडली.

  • Share this:

मनमाड, 16 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जीवाची बाजी लावून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस आपलं कर्तृव्य बजावत आहे. या परिस्थितीत पत्रकारही आपलं कर्तृव्य पार पाडत आहे. परंतु, मनमाडमध्ये विरोधात बातमी लावल्याचा रागातून पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

विरोधात बातमी छापली असल्याचा राग मनात धरून सरपंचाने एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला जबर मारहाण केल्याची  घटना बागलाणच्या आंबसन येथे घडली. दीपक खैरनार असं या प्रतिनिधींचं नाव असून मारहाणीत त्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला नामपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सरपंच जितेंद्र अहिरे याला अटक केली आहे.

हेही वाचा - घातपाताचा मोठा कट उधळला, 4 आयडी स्फोटकांसह 3 पेट्रोल बॉम्ब जप्त

या बाबत अधिक वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात आंबसन या गावात काही दिवसांपूर्वी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. पाण्याचा मुबलक साठा असतांना देखील ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली, अशा आशयाची बातमी पत्रकार दीपक खैरनार यांनी वृत्त पत्रात प्रसिद्ध केली होती.

बातमी वस्तुस्थितीला धरून होती. मात्र, आपल्या विरोधात ही बातमी असल्याचा राग मनात धरून सरपंच जितेंद्र अहिरे व त्याच्या इतर साथीदारांनी खैरनार यांना शिवीगाळ करत जबर मारहाण केली.

हेही वाचा -सलग तिसऱ्या दिवशी अपघात, घरी पोहचण्याआधीच 23 लोकांचा प्रवास ठरला शेवटचा

या मारहाणीत खैरनार यांना गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना नामपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून सरपंच जितेंद्र अहिरे याला अटक केली आहे. पोलिसांनी सरपंच व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 16, 2020, 12:59 PM IST

ताज्या बातम्या