तुम्हाला नको तर आम्हाला द्या! भाजपने नाकारलेल्या महिला उमेदवाराला NCPने दिलं तिकीट

तुम्हाला नको तर आम्हाला द्या! भाजपने नाकारलेल्या महिला उमेदवाराला NCPने दिलं तिकीट

भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे सरोज अहिरे यांनी भाजपला रामराम ठोकत त्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 03 ऑक्टोबर : भाजपमध्ये विधानसभेच्या तोंडावर जितक्या वेगाना इनकमिंग झालं आता तितकाच फटका बसत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत. कारण ज्या विद्यमान आमदारांना आणि इच्छुकांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी थेट बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. नाशिकमध्येही भाजपला बंडखोरीचा पहिला फटका भाजपला बसला आहे. नाशिक देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे या इच्छूक विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होत्या. पण युतीच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा सेनेला गेल्यानं आहिरे यांनी बंड केला आहे.

भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे सरोज अहिरे यांनी भाजपला रामराम ठोकत त्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सरोज आहिरे या भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत. नाशिक देवळालीमधून सरोज अहिरे राष्ट्रवादीच्या उमेदवार असणार आहेत. सरोज या मनपाच्या महिला बालविकास समितीच्या सभापती होत्या. नाशिक पश्चिम मतदारसंघात सेना-भाजप संघर्ष सुरू असतांना राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर न केल्यानं सस्पेन्स कायम आहे.

इतर बातम्या - भाजप उमेदवाराकडे 500 कोटींची संपत्ती, टॉप कारसह मुंबईत 5 आलीशान फ्लॅट!

भाजपमध्ये पहिली मोठी बंडखोरी; नाशिकमध्ये 14 नगरसेवकांचा राजीनामा

नाशिकमध्ये पूर्वच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच भाजपला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. पुण्यात कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्यासाठी तिकीट कापलेल्या आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यात भाजपच्या नेत्यांना यश आलं असलं तरी नाशिकमध्ये मात्र विद्यमान आमदारांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. नाशिकमध्ये भाजपच्या 14 नगरसेवकांचा राजीनाम दिला. नाशिक पूर्व मतदारसंघातले विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी मिळावी यासाठी आमदारांनी राजीनामे दिले आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत आमदार सानप यांचं नाव नसल्याने समर्थकांनी दबाव टाकायला सुरुवात केली आहे.

इतर बातम्या - उदयनराजेंच्या विरोधात आघाडीने उतरवला उमेदवार, पवारांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन

गिरीश महाजनांच्या शिवनेरी बंगल्यावर सानप समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केलं होतं. आता 14 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. यात 8 महिला नगरसेवक आहेत. बाळासाहेब सानप यांच्या समर्थनार्थ दिला राजीनामा दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणखीही काही नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं समजतं.

पंचवटी परिसरात सानप समर्थकांनी गर्दी केली. मोठा पोलीस बंदोबस्त संध्याकाळी या परिसरात ठेवण्यात आला होता. समर्थकांची सानप यांच्या कार्यालयात मोठी गर्दी झाल्याने अतिरिक्त पोलीस कुमक दाखल झाली. बाळासाहेब सानप यांनी समर्थकांना सबुरीचं आवाहन केलं आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 3, 2019, 12:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading