• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • परभणीत ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू; शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर

परभणीत ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू; शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर

शहरातील शासकीय रुग्णालयमध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीचा ऑक्सिजन अभावी मृत्यू (Patients die due to lack of oxygen) झाल्याची घटना समोर आली आहे. मृत रुग्णाला सारी (SARI) आजाराचं निदान झालं होतं. यानंतर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात बराच गोंधळ घातला आहे.

  • Share this:
परभणी, 03 एप्रिल: शहरातील शासकीय रुग्णालयमध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीचा ऑक्सिजनअभावी मृत्यू (Patients die due to lack of oxygen) झाल्याची घटना समोर आली आहे. मृत रुग्णाला सारी (SARI) आजाराचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री उशिरा ऑक्सिजन न मिळाल्यानं संबंधित रुग्णाचा मृत्यू (Death) झाला आहे, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालायला सुरुवात केल्यानंतर ऐनवेळी पोलीस आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मृताच्या कुटुंबीयांकडून केलेले सर्व आरोप निराधार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. पण याबाबतची माहिती कॅमेऱ्यासमोर देण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 65 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव दासराव आंबटपुरे असं असून ते परभणी शहरातील रहिवासी आहेत. काल रात्री उशिरा ऑक्सिजन अभावी त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मृत रुग्ण आंबटपुरे यांना 30 मार्च रोजी श्वास घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यानंतर त्यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील सारी वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण काल रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी शासकीय रुग्णालय प्रशासनातील कर्मचाऱ्यांना ऑक्सिजनची विचारणा केली असता, त्यांनी पळ काढला आहे, असा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातचं गोंधळ सुरू केला आहे. हे ही वाचा- चोरांनी वृद्धाचे हात पाय बांधून केली निर्घृण हत्या, घटना CCTV मध्ये कैद दरम्यान कोणीतरी पोलिसांना फोन करून घटनेची माहीती दिली. पोलिसांनी रुग्णालयात तातडीनं धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याविषयी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचं त्यांनी नाकारलं आहे. परंतु हीच बाब कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्यास सांगितलं असताना त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. संबंधित रुग्णालयात यापूर्वीही ऑक्सिजन अभावी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. संबंधित घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
Published by:News18 Desk
First published: