सारथीचा वाद पेटला, छञपती संभाजीराजे उपोषणाला बसणार

सारथीचा वाद पेटला, छञपती संभाजीराजे उपोषणाला बसणार

मराठा समाजातील युवक युवतींच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पुण्यातील सारथी संस्थेवरून वाद शमायला तयार नाही

  • Share this:

पुणे, 09 जानेवारी : मराठा समाजातील युवक युवतींच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पुण्यातील सारथी संस्थेवरून  वाद शमायला तयार नाही. आता याबाबत राज्यसभेचे खासदार छञपती संभाजीराजे यांनी उपोषणाला बसणार असण्याची घोषणा केली आहे.

सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. येत्या 11 तारखेला  सारथी संस्थेच्या बाहेर उपोषण बसणार असल्याचं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.  गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे, विशेष म्हणजे या संस्थेचे उद्घाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता.  त्यानंतर , दुसऱ्याच दिवशी मी सारथीच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन, दोन्ही बाजूंची भूमिका समजून घेतली आणि सरकार स्थिरस्थावर होईपर्यंत कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, जे पी गुप्ता हे प्रधान सचिव दररोज नवीन आदेश काढून संस्थेला बदनाम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना अशी कोणती घाई झाली आहे, की दररोज आदेश काढत आहेत? असा सवाल संभाजीराजे यांनी केला.

मध्यंतरी,  संभाजीराजे यांनी सारथीला भेट दिली होती. तेव्हा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अंधारात ठेवलं, असा दावा करून सारथीठप्प करणं हे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक परिहार यांनीही प्रधान सचिव गुप्ता यांच्यावर कट रचल्याचा थेट आरोप केला होता.

देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देतानाच समाजातील युवकांसाठी राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने बार्टीच्या धर्तीवर सारथीची स्थापना केली. परिहार आणि सदानंद मोरे यांची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली होती.

मात्र, फडणवीस सरकार पायउतार होऊन उद्धव ठाकरे सरकार स्थापन होण्याच्या मधल्या काळात गुप्ता नामक प्रधान सचिवांनी पत्रक काढून सारथीचे अनुदान थांबवण्याचे आदेश दिले आणि संपूर्ण मराठा समाजात विशेषतः विद्यार्थी वर्गात खळबळ उडाली.

नागपूर अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता.  त्यानंतर महाविकासआघाडी सरकारने सारथी संस्थेचं अनुदान कोणत्या परिस्थितीत बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना अनुदान मिळाला आहे, त्यांचा अनुदान सुरूच राहणार आहे, असं पत्रक काढून स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2020 06:41 PM IST

ताज्या बातम्या