तुकोबारायांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान

तुकोबारायांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान

  • Share this:

16 जून : आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्राला वेध लागतात पंढरीच्या वारीचे. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान होणार आहे. पालखीची सर्व तयारी झाली असून आजपासून पंढरपूरच्या वारीला सुरूवात होत आहे. आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेला प्रत्येक वारकरी आता वारीसाठी सज्ज झाला आहे.

आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे, हा प्रस्थान सोहळा हा वारकर्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करतो. हा सोहळा अनुभवण्यासाठी देहु मध्ये चार लाख भविक दाखल झाले आहेत. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात ३३१ दिंड्या सहभागी झाल्या असून पालखी सोहळ्याचं हे ३३२ वं वर्षं आहे.

सकाळी दहा नंतर मंदिराच्या प्रांगणात दिंड्या सोडायला सुरवात होईल. त्यानंतर खेळ सुरू होतील, आणि दुपारी २ नंतर पालखी प्रस्थान ठेवणार आहे. पालखीचा पहिला मुक्काम देहूच्याच इनामदारवाड्यात असणार आहे.

दरवर्षी तुकोबांच्या पालखीत शेकडो वारकरी सहभागी होतात. उन वारा पावसाची पर्वा न करता विठूनामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होतात. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खास व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टर आणि अँब्युलन्सचं पथकही सोबत असणार आहे. त्यामुळे आज विठूनामाचा गजरात देहूनगरी दुमदुमून जाईल. तर उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.

First published: June 16, 2017, 10:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading