तुम्हाही मॉर्निंग वॉक करा..संजीव पुनाळेकरने श्रीपाल सबनीसांना दिला होता धमकीवजा इशारा

पिंपरी चिंचवडला 2016 साली साहित्य संमेलन अध्यक्षपदी असताना श्रीपाल सबनीस यांना मॉर्निंग वॉक करा, असा धमकीवजा इशारा सनातन संस्थेचे वकील संजीव पनाळेकर यांनी दिला होता.

News18 Lokmat | Updated On: May 26, 2019 04:23 PM IST

तुम्हाही मॉर्निंग वॉक करा..संजीव पुनाळेकरने श्रीपाल सबनीसांना दिला होता धमकीवजा इशारा

पुणे, 26 मे- पिंपरी चिंचवडला 2016 साली साहित्य संमेलन अध्यक्षपदी असताना श्रीपाल सबनीस यांना मॉर्निंग वॉक करा, असा धमकीवजा इशारा सनातन संस्थेचे वकील संजीव पनाळेकर यांनी दिला होता. आपल्यालाही दाभोलकर, पानसरे करण्याचा त्यांचा डाव होता, श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होता. परंतु पोलिसांनी तो तपास बंद केला. हा नालायक, बेशरमपणा आहे. आता ही फाईल पुन्हा उघडावी, अशी मागणी सबनीस यांनी केली आहे. मोदींच्या करिष्म्याला कलंक ठरू नये, असे वाटत असेल तर आपल्याला दिलेल्या धमकीबाबत पुनाळेकरची सखोल चौकशी करावी आणि संविधानाला धोका असलेल्या सनातन संस्थेच्या गाभ्यात पोचून सुत्रधारांना पकडावे, अशीही मागणी सबनीस यांनी केली आहे.

अंनिसकडून अटकेचे स्वागत

अंधश्रद्धा निर्मुलन समितीने अटकेचे स्वागत केले, सूत्रधार सापडतील अशी आशा अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी व्यक्त केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सुरुवातीला वीरेंद्र तावडे ,अमोल काळे, सचिन अंधुरे आणि आता संजीव पुनाळेकर, विक्रम भावे हे सीबीआयच्या जाळ्यात अडकल्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्याने महत्त्वाचे वळण घेतले आहे. सनातन संस्थेचे वकील आणि सल्लागार संजीव पुनाळेकरांनासह विक्रम भावेला काल मुंबईत सीबीआयने अटक आली. आज या दोघांना पुणे कोर्टात हजर करण्यात आले. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेकडून कटाची माहिती मिळवायची आहे. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे ज्यांची विल्हेवाट लावली, त्याबाबत माहिती घ्यायची आहे. पुनाळेकर आणि भावे यांचा कसा सहभाग होता, हे जाणून घ्यायचे आहे. यासाठी सीबीआयच्या वकिलांनी कोठडीची मागणी केली. ही मागणी कोर्टाने मान्य करत संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला एक जूनपर्यत सीबीआय कोठडी सुनावली आहे. मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मधील जामिनावर बाहेर असलेले संशयित आरोपी समीर कुलकर्नीही कोर्ट परिसरात हजर आहे. संजीव पुनाळेकर हे या हत्याकांडातील आरोपींचेही वकील आहेत. विक्रम भावे यांचे मालेगाव स्फोटाशी कनेक्शन असल्याचे समजते.

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करणे, हत्येच्या कटात सहभागी होणे, असे आरोप संजीव पुनाळेकरवर तर आरोपींना प्रत्यक्ष घटनास्थळ रेकी, दाभोलकरांची ओळख करुन देणे, हत्येच्या कटात सहभागी होणे या आरोपाखाली विक्रम भावे याला अटक करण्यात आली आहे. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी तसेच त्याचे मालेगाव ब्लास्ट कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकला निघालेल्य डॉ. नरेंद्र दाभोलकरांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

अनेक दिवसांपासून सीबीआयच्या रडारवर..

Loading...

संजीव पुनाळेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयच्या रडारवर होते. अखेर सीबीआयने त्यांच्याभोवती फास आवळला. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी ताब्यात घेतलेले सचीन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या चौकशीत सीबीआयली संजीव पुनाळेकरबाबत माहिती मिळाली. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश प्रकरणात आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबात ही संजीव पुनाळेकरचे नाव समोर आले होते.पुनाळेकरांनी गौरीलंकेश हत्या प्रकरणात आरोपींना मदत केल्याची आरोपींनी कबूली दिली होती.


SPECIAL REPORT: डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2019 04:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...