मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'संजय शिरसाट गुवाहाटीचे, तर बच्चू कडू...', पालकमंत्र्यांची घोषणा होताच राष्ट्रवादीचा निशाणा

'संजय शिरसाट गुवाहाटीचे, तर बच्चू कडू...', पालकमंत्र्यांची घोषणा होताच राष्ट्रवादीचा निशाणा

शनिवारी राज्याच्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने निशाणा साधला आहे.

शनिवारी राज्याच्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने निशाणा साधला आहे.

शनिवारी राज्याच्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने निशाणा साधला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 25 सप्टेंबर : महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार व्हायला महिनाभरापेक्षा जास्त काळ गेला, त्यानंतरही पालकमंत्र्यांची घोषणा झाली नव्हती, त्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं, यानंतर काल शनिवारी राज्याच्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने निशाणा साधला आहे.

'संजय शिरसाट यांची गुवाहाटी जिल्ह्याच्या,तर बच्चू कडू यांची सुरत जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन... असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रवीकांत वरपे यांनी केलं आहे. सोबतच त्यांनी 50 खोके! एकदम ओके!!', असंही त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

सरकार स्थापन झाल्यानंतर महिन्याभरापेक्षा जास्त काळानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. या विस्तारात संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांना स्थान मिळालं नव्हतं. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे संजय शिरसाट नाराज झाले होते, तर बच्चू कडू यांनीही अनेकवेळा सार्वजनिकरित्या आपली नाराजी बोलून दाखवली. बच्चू कडू हे महाविकासआघाडी सरकारमध्ये मंत्री होते, पण तरीही ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत.

अजितदादांची प्रतिक्रिया

दरम्यान अजित पवार यांनीही पालकमंत्र्यांची घोषणा झाल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आज मंत्रिमंडळाची संख्या 20 आहे. 36 जिल्ह्यांची पालकमंत्रीपदं 20 मंत्र्यांमध्ये देण्यात आली आहेत. आम्ही पालकमंत्री मागत होतो, त्यांनी ते दिले आहेत. 3 महिने कुणीच पालकमंत्री नव्हतं. मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा ते पद पुन्हा वाटून दिलं जाईल, असं अजित पवार म्हणाले.

फडणवीसांकडे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद

देवेंद्र फडणवीसांकडे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. मी पुण्याचा पालकमंत्री होतो तर नाकीनऊ यायचे, त्यांना ते कसं पेलवणार हे माहिती नाही, पण शुभेच्छा आहे, असा टोलाही अजितदादांनी लगावला होता.

'सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात, मी तर तुम्हाला...', फडणवीसांचा अजितदादांना गुरूमंत्र

First published: