Home /News /maharashtra /

'तलाश नए रास्तों की है..' राजकीय वर्तुळातील वादळादरम्यान संजय राऊतांचं हे ट्वीट ठरतंय चर्चेचा विषय

'तलाश नए रास्तों की है..' राजकीय वर्तुळातील वादळादरम्यान संजय राऊतांचं हे ट्वीट ठरतंय चर्चेचा विषय

शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. आता मात्र त्यांनी केलेलं एक ट्वीट (Sanjay Raut Tweet) चर्चेचा विषय ठरत आहे.

  मुंबई 21 मार्च : मुंबईचे (Mumbai Police)माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी लेटर बॉम्ब टाकून महाविकास आघाडी सरकारमध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात वादळ आल्याचं चित्र आहे. भाजपनं या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला चांगलंच घेरलं आहे. विरोधी पक्षाकडून हा मुद्दा चांगलाच उचलून धरण्यात आलेला असतानाच शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मात्र या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. आता मात्र त्यांनी केलेलं एक ट्वीट (Sanjay Raut Tweet) चर्चेचा विषय ठरत आहे. एखाद्यावर टीका करण्यासाठी किंवा एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया देताना बऱ्याचदा राऊत आपल्या ट्विटरच्या माध्यमातून शायरी पोस्ट करत असतात. यावेळीदेखील आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी हाच पर्याय निवडला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, 'हमको तो तलाश बस नए रास्तों की है ..हम हैं मुसाफिर ऐसे जो मंझिल से आए है...' संजय राऊत यांच्या या ट्वीटचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडलेला असताना राऊत यांनी आता स्वतःच यावर उत्तर दिलं आहे. माझ्या ट्वीटचा अर्थ लवकरच कळेल, असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजेच या ट्वीटचा संबंध नक्कीच पुढे घडणाऱ्या काही घटनांसोबत राऊत यांनी जोडला आहे. दरम्यान, शरद पवार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या संपूर्ण प्रकारानंतर शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना या प्रकरणासंदर्भात संपूर्ण माहिती दिली. शरद पवार दिल्लीत असून आज दूरध्वनीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. आता या प्रकरणात आणखी काय नवीन वळण येणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Anil deshmukh, Sanjay raut

  पुढील बातम्या