मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अमृता फडणवीस प्रकरणावर राऊत पहिल्यांदाच बोलले; देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप!

अमृता फडणवीस प्रकरणावर राऊत पहिल्यांदाच बोलले; देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप!

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 मार्च : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच राज्यात मुख्यमंत्री नसून मख्खमंत्री असल्याचं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. यावेळी बोलताना त्यांनी अमृता फडणवीस प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत? 

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. राज्यातील अस्थिरता फडणवीसांनी समजून घ्यावी. फडणवीसांचे नाकानं कांदे सोलनं सुरू आहे. फडणवीसांचे हात दगडाखाली आडकले आहेत. राज्यात अराजकता माजली आहे. विरोधकांना ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल जात आहे. फडणवीस राहुल कुल यांना वाचवत आहेत का? असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

कोण आहेत अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी? ज्यांनी थेट अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केला

अमृता फडणवीसांवर प्रतिक्रिया  

अनिक्षा जयसिंघानी या व्यवसायने डिझायनर असलेल्या मुलीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. या बदल्यात तिने आपल्या वडिलांच्या सुटकेची मागणी केली होती. यानंतर या प्रकरणात अमृता फडणवीस यांनी पोलिसात तक्रार दिली असून, संबंधित मुलीला अटक करण्यात आलं आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस फसवणूक प्रकरण कौटुंबिक आहे. आम्हाला भाजपप्रमाणे कोणाच्या कुटुंबात घुसण्याची सवय नाही, असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांना टोला 

दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. राज्यात मुख्यमंत्री नसून मख्खमंत्री असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Sanjay raut, Shiv sena