सांगली, 09 एप्रिल : एसटी कर्मचाऱ्यांनी (ST employees Violence case) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी घातलेल्या गोंधळ प्रकरणी एकीकडे राज्यभरात चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, 'शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यामागे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा हात आहे', असा खळबळजनक आरोप भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावरील हल्ला प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना प्रवीण दरेकर यांनी तर थेट संजय राऊत यांच्यावरच निशाणा साधला आहे.
(OMG..!जगभरात सर्वांत महाग LPG फक्त भारतात; काय आहे त्यामागचं कारण)
संजय राऊत हे भ्रमिष्ट झालेले नेते आहेत. त्यांच्या सर्व विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपासून संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झाले आहे. वारंवार त्यांच्या भूमिका बदलत आहे. त्यांची विधान येत आहे. मला तर संशय येतोय की संजय राऊत यांनी काही नियोजन पद्धतीने कार्यक्रम केला की काय अशी शंका आहे. संजय राऊत यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावरील हल्ल्या मागे हात असावा, अशा प्रकार शंका घ्यायला त्यांची वाव आहे, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे' असा दावाच दरेकर यांनी केलं आहे.
(श्रीलंकेनं का ताब्यात घेतले 12 भारतीय मच्छिमार? सुटकेसाठी मागितली इतकी रक्कम)
तसंच, 'मीडियाला कळते आणि मीडियावाले आंदोलनाच्या ठिकाणी उभे राहतात. आदल्या दिवशी मोर्चेकरांना आवाहन तिथे होतं. मग अशा वेळी संजय राऊत यांचे सरकार आहे, पोलीस काय झोपा काढत होते का? पोलिसांच्या गुप्त विभागाचे हे अपयश आहे. जी लोक आपल्या नेत्यांची संरक्षण करू शकत नाही, आपल्या नेत्यांची काळजी घेऊ शकत नाही. त्यांनी राज्याच्या हिताची गोष्टी करू नये, या प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज आहे, असंही दरेकर म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pravin darekar, Sanjay raut, Sharad Pawar, St bus, Strike