राहुल गांधींच्या सौम्य हिंदुत्वाला शिवसेनेचा पाठिंबा-संजय राऊत

राहुल गांधींच्या सौम्य हिंदुत्वाला शिवसेनेचा पाठिंबा-संजय राऊत

मुळात राहुल गांधी हिंदू की अहिंदू हा वादच निरर्थक आहे असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. भाजपाने इतक्या खालच्या पातळीचा वाद उकरून काढला असल्यामुळे संजय राऊत हादरलेही आहेत.राहुल गांधींच्या सौम्य हिंदुत्वाचा स्वीकार त्यांनी केला आहे.

  • Share this:

03 डिसेंबर:  राहुल गांधींच्या सौम्य हिंदुत्वाच्या भूमिकेला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. गुजरात निवडणुकीत राहुल गांधींच्या हिंदुत्वाबाबत विनाकारण वाद निर्माण केला जात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. हिंदुत्व ही भाजपची मक्तेदारी नाही असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

मुळात राहुल गांधी हिंदू की अहिंदू हा वादच निरर्थक आहे असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. भाजपाने इतक्या खालच्या पातळीचा वाद उकरून काढला असल्यामुळे संजय राऊत हादरलेही  आहेत.राहुल गांधींच्या सौम्य  हिंदुत्वाचा  स्वीकार  त्यांनी केला आहे. तसंच हा शिवसेनेच्या विचारांचा विजय असल्याचंही त्यांचं मत आहे. सध्या लोकशाहीच्या खून पाडणाऱ्या प्रवृत्ती सत्तेत आहेत अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.  काँग्रेस नेत्यांवरील हल्ला हासुद्धा दहशत निर्माण करून निवडणूका जिंकण्यासाठी केलेला प्रकार आहे.  भाजपला याची गरज का पडतेय, राहुल गांधीने सर्वाना जेरीला आणले आहे असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.

त्यामुळे आता या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलं आहे.

 

First published: December 3, 2017, 8:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading