मुंबई, 19 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पण शिवसेना आणि भाजपच्या युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्यातच युतीबाबत थेट वक्तव्य करून शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही रावतेंचं समर्थन केलं आहे.
'जर युतीत शिवसेनेला समान जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटेल,' असं म्हणून दिवाकर रावतेंनी खळबळ उडवून दिली होती. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आधी 50-50 चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यामुळे दिवाकर रावते जे बोलले त्यात काहीही चुकीचं नाही.'
शिवसेनेवर कुरघोडीचा भाजपचा प्रयत्न
संपूर्ण राज्यभर सध्या विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे. त्यात भाजप शिवसेनेची युती तुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार का? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. जागावाटपावरून भाजप सेनेमध्ये वाद आहे. जागावाटपाचा फार्म्युला हा समसमान असणार की शिवसेनेला भाजप 115 ते 120 मतदारसंघच देणार, यावर सध्या मोठा सस्पेन्स आहे.
Special Report : 'पवारसाहेब भाकरी फिरली कुठे?'
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा