मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना...', संजय राऊतांचा Video दाखवत घणाघात

'मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना...', संजय राऊतांचा Video दाखवत घणाघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीतल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेअर केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीतल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेअर केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीतल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेअर केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 7 फेब्रुवारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरळीच्या कोळी बांधवांकडून जाहीर सत्कार करण्यात आला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानामुळे या कार्यक्रमाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन वरळीतून माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी, वरळी नको असेल तर मी ठाण्यातूनही निवडणूक लढवायला तयार आहे, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं.

वरळीतल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमातला एक व्हिडिओ शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना नागरिक जात असताना तसंच कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या खूर्च्या रिकाम्या दिसत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. @वरळी कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला. कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय. 32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना?', असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानावर पलटवार केला आहे. 'काही जण सकाळी उठतात, खोके गद्दार बोलतात. काही लोक मला आव्हान देत आहेत. मी आमच्या लोकांना सांगितलं. मी छोटी-मोठी आव्हानं स्वीकारत नाही. मला जे आव्हान स्वीकारायचं होतं ते सहा महिन्यांपूर्वी पूर्ण केलं. जास्त इच्छा असेल तर महापालिका वॉर्डात उभे राहा,' असा टोला मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

'मी जास्त बोलत नाही, मला काम करायचं आहे. मला कोणी तरी म्हणे आम्ही जेव्हा गुवाहाटीला होतो तेव्हा वरळीतून जाऊन दाखवा. हा एकनाथ शिंदे वरळीतून एकटा गेला, हेलिकॉप्टरने गेला नाही. निवडणुका समोर ठेवून आम्ही काम करत नाही', असं प्रत्युत्तरही मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना दिलं.

First published:

Tags: Eknath Shinde, Sanjay raut, Shivsena