मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...हा राजद्रोहच म्हणायला हवा', संजय राऊत राज्यपालांवर भडकले

'...हा राजद्रोहच म्हणायला हवा', संजय राऊत राज्यपालांवर भडकले


'शिवाजी राजांविषयी चुकीची विधाने पंडित नेहरू ते मोरारजी देसाईंनी केली. तेव्हा खवळलेल्या महाराष्ट्राने त्यांना माफी मागायला भाग पडले. तोच महाराष्ट्र आज थंड, लोळागोळा होऊन पडला आहे.

'शिवाजी राजांविषयी चुकीची विधाने पंडित नेहरू ते मोरारजी देसाईंनी केली. तेव्हा खवळलेल्या महाराष्ट्राने त्यांना माफी मागायला भाग पडले. तोच महाराष्ट्र आज थंड, लोळागोळा होऊन पडला आहे.

'शिवाजी राजांविषयी चुकीची विधाने पंडित नेहरू ते मोरारजी देसाईंनी केली. तेव्हा खवळलेल्या महाराष्ट्राने त्यांना माफी मागायला भाग पडले. तोच महाराष्ट्र आज थंड, लोळागोळा होऊन पडला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 27 नोव्हेंबर : 'वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणात भाजपने जो जोश व जोर दाखवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रकरणात दाखवला नाही. उलट छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचे समर्थन केले. शिवरायांचे चरित्र विसरले जात आहे. महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय? असा सवाल करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. याच मुद्यावर संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपवर निशाणा साधला.

'महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांना ‘कालबाहय़’ म्हणजे जुने-पुराणे हिरो असे संबोधून वादळ ओढवून घेतले आहे. इकडे राज्यपाल शिवराय जुनेपुराणे झाले असे म्हणतात तर तिकडे भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी राजांनी औरंगजेबास तडजोडीसाठी पाच पत्रे पाठवली म्हणजे माफीच मागितल्याचा स्पष्ट करून महाराष्ट्राची मने दुखावली आहेत. या दोन लोकांनी शिवाजी राजांचा अपमान करूनही महाराष्ट्राचे सरकार तोंड शिवून बसले. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अपमानाच्या विरोधात साधा निषेध केला नाही. उलट राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांचा बचाव केला. असे आक्रित इंग्रजकाळातही घडले नव्हते. म्हणूनच काळ मोठा कठीण आला आहे असेच म्हणावे लागेल, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला.

(तर खोके कुणाकडे गेले ते एक दिवस सांगेल; दीपक केसरकरांचं थेट ठाकरेंना आव्हान )

'शिवरायांचा अपमान राज्यपालांनी पहिल्यांदाच केला नाही, याआधी तो वारंवार केला आहे. राज्यपाल कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, ही मागणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. अशा राज्यपालांचे व शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणे हा राजद्रोहासारखा गुन्हा आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांची केलेली निंदा हा जर राजद्रोहासारखा गुन्हा ठरत असेल तर मग महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांची निंदा हा राजद्रोहच म्हणायला हवा, अशी टीकाही राऊत यांनी केली.

'शिवचरित्राचे खरे सार काढले तर त्यातून दोन प्रमुख सूत्रे बाहेर येतात. एक परचक्राचा हरतऱ्हेने विरोध करून स्वराज्य स्थापायचे आणि दुसरे स्वराज्याचा पाया मुख्यतः कष्टाळू जनतेवर आधारून तिला अनुरूप अशा सुधारणा करून स्वराज्य स्थापन करायचे. बेकारी नष्ट करणे व त्यासाठी त्या काळात योजना राबवणे हा विचार जुना-पुराणा कसा होऊ शकतो? मोदी पंतप्रधान म्हणून बेकारांना नोकऱ्या देत आहेत व शिवरायांनी वतनदाऱ्या नष्ट केल्या, तशी सरदार वल्लभभाई पटेलांनी संस्थाने नष्ट केली ते काय शिवरायांचे विचार कालबाह्य झाले म्हणून? असा सवालही राऊत यांनी केला.

(वाचा - देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी लाज.. ठाकरेंनी भरसभेत तो व्हिडीओ केला प्ले)

'शिवाजी राजांविषयी चुकीची विधाने पंडित नेहरू ते मोरारजी देसाईंनी केली. तेव्हा खवळलेल्या महाराष्ट्राने त्यांना माफी मागायला भाग पडले. तोच महाराष्ट्र आज थंड, लोळागोळा होऊन पडला आहे. मागे एका प्रकरणात छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा अपमान झाला म्हणून संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना ‘सांगली बंद’ केले, पण आज छत्रपती शिवरायांचा भाजपकृत अपमान होऊनही ते गप्प आहेत. या प्रश्नी सर्व शिवप्रेमी संस्था व संघटनांनी एकत्र येऊन ‘महाराष्ट्र बंद’चीच हाक द्यायला हवी. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यावर इस्लामी व अरब राष्ट्रांनी निषेध करताच भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, पण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांचे मात्र समर्थन केले जाते! बदनामी करणाऱ्यांचा केसही वाकडा झाला नाही. ते त्यांच्या पक्षात आणि पदावर कायम आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली.

First published:

Tags: Marathi news