मुंबई, 15 नोव्हेंबर: कुणीही किती प्रयत्न केले तरी शिवसेनेचंच सरकार येणार आणि मुख्यमंत्री सेनेचाच होणार याचा पुनरूच्चार शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांनी केला. फॉर्म्युल्याची चिंता कुणी करू नये किमान समान कार्यक्रमावर आधारित सरकारचं काम चालेल असं त्यांनी सांगितलं. आता कोणी मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणार नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. पाच वर्ष काय पुढची 25 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहावा अशी आमची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं.