Home /News /maharashtra /

Shiv Sena Sada Sarvankar : मनोहर जोशींचं घर जाळण्याचे आदेश राऊतांनी दिले, बंडखोर सदा सरवणकर यांचा गौप्यस्फोट video

Shiv Sena Sada Sarvankar : मनोहर जोशींचं घर जाळण्याचे आदेश राऊतांनी दिले, बंडखोर सदा सरवणकर यांचा गौप्यस्फोट video

बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी news18 लोकमतशी (news 18 lokmat) बोलताना संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी मनोहर जोशी यांचे नाव घेत थेट संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

  मुंबई, 28 जून : एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासह शिवसेनेतील (shiv sena 40 mla in guwahati) 40 आमदार बंडखोरी करत गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी बंडखोर आमदारांचा मागच्या 4 दिवसांपासून खरपूस समाचार घेत आहेत. याला प्रतित्त्यूर म्हणून बंडखोर आमदार मीडियाला गुवाहाटीतून प्रतिक्रीया देत आहेत. संजय राऊत यांनी सदा सरवणकर (shiv sena mla sada sarvankar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. दरम्यान यावर सरवणकर यांनीही news18 लोकमतशी (news 18 lokmat) बोलताना संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी थेट मनोहर जोशी यांचे घर जाळण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप सरवणकर यांनी केला आहे. 

  सदा सरवणकर म्हणाले कि, मी शिवसेनेत मागच्या कित्येक वर्षांपासून काम करत आहे. मातोश्री ज्यावेळी अडचणीत येते त्यावेळी असेल त्या ठिकाणाहून आम्ही शिवसैनिक घेऊन हजर राहायचो. ज्या संजय राऊत सामना कार्यालयात बसतात ते कार्यालय आम्ही बांधले आहे. त्या कार्यालयाला पाणी पुरवण्याचे काम माझ्यासह अन्य शिवसैनिकांनी केले आहे. या संजय राऊतांनी मनोहर जोशींच घर जाळण्यासाठी आम्हाला आदेश दिल्याचाही त्यांनी थेट आरोप करत गौप्यस्फोट केला आहे. 

  हे ही वाचा : माजी आमदारांनाही लागले झाडी..डोंगराचे वेध, शिंदे गटाला दिला पाठिंबा, सेनेला धक्का

  सदा सरवणकर पुढे म्हणाले कि, आम्ही शिवसेना अडचणीत असताना सगळ्यात पुढे असतो हे आमच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांना माहिती आहे. आम्ही सत्तेत असुनही मंत्र्यांच्या आमच्या कामासाठी पाया पडावे लागायचे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर त्यांच्याकडे असलेल्या मंत्रीमंडळाचा मोठा गैरकारभार केला आहे.

  आम्ही यासाठी शिवसेनेच्या बड्या नेत्यांकडे वेळोवेळी तक्रार केली परंतु यावर एकाही नेत्यांने त्याना विचारण्याचे धाडस केले नाही. हाच राग आमच्या मनात असल्याने आम्ही हे पाऊल उचलल्याचे म्हणाले.  तसेच ते पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे आमचा विठ्ठल आहे त्यांनी आम्ही कधीच विसरणार नसल्याचे ते म्हणाले.

  हे ही वाचा : संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला मारलं, 52 मिनिटांची सीडी समोर आणू, शिवसैनिकांनीच दिला इशारा

  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर (mva government) अस्थिरतेचे संकट उभे ठाकले आहे. एक एक करून आमदार शिंदे गटात सामील होत आहे. आता सोलापुरात शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील (naryan pati) शिंदे गटात सामील झाले असून पाठिंबा दर्शवला आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Sanjay Raut (Politician), Shiv sena, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या