VIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...

मुंबई, 21 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील भाषणात राम मंदिर प्रश्नांवर 'बडबोले' आणि 'बयान बहाद्दर' यांच्यावर टीका केला होती. ही टीका शिवसेनेला उद्देशून केली असल्याचं प्रसिद्धी माध्यमातून दाखवल्यानंतर आज सामना अग्रलेखातून मोदींना स्वपक्षातीलच वाचाळवीरांना चाप बसवण्यासाठी हे विधान केल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. भाजपमधल्या अनेक वाचाळवीरांनी सुप्रीम कोर्ट भाजपचेच असल्याचं सांगून पंतप्रधानांनाच अडचणीत आणलं. त्यामुळे अशा वाचाळवीरांना कानपिचक्या देण्यासाठीच पंतप्रधानांनी हे वक्तव्य केल्याचं सामना अग्रलेखातही म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.