Home /News /maharashtra /

VIDEO: बुरखा बंदीवरून संजय राऊत यांचा यूटर्न

मुंबई, 5 मे: शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी अग्रलेखातून श्रीलंके प्रमाणे भारतातही बुरखा बंदीचा निर्णय सरकारने घ्यावा या संदर्भात वादग्रस्त मागणी केली होती. त्यामुळे शिवसेना पक्षातच वादळ निर्माण झालं होतं. खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नाराजीला संजय राऊत यांना सामोरं जावं लागलं. शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी बुरखा बंदी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे शिवसेनेत एकटे पडलेले संजय राऊत यांनी 'रोखठोक' या सदरात सपशेल माघार घेत, बुरखा बंदीची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नसल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. तसेच बुरखा बंदीची भूमिका ही केवळ सामाजिक जाणिवेतून केल्याची सारवासारवही आजच्या (5 मे) रोखठोख या सदरातून संजय राऊत यांनी केली आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Lok sabha election 2019

    पुढील बातम्या