Home /News /maharashtra /

शिवसेनेनेच केलं ऑपरेशन लोटस? मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर 20 तासांमध्येच यूटर्न का?

शिवसेनेनेच केलं ऑपरेशन लोटस? मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर 20 तासांमध्येच यूटर्न का?

महाविकास आघाडीमधून (Mahavikas Aghadi) शिवसेना (Shivsena) बाहेर पडण्यासाठी तयार असल्याचं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे, पण त्यासाठी पहिले मुंबईत या आणि अधिकृत मागणी करा, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

    मुंबई, 23 मे : महाविकास आघाडीमधून (Mahavikas Aghadi) शिवसेना (Shivsena) बाहेर पडण्यासाठी तयार असल्याचं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे, पण त्यासाठी पहिले मुंबईत या आणि अधिकृत मागणी करा. तुमच्या मागणीचा नक्की विचार करू, अशी अटही संजय राऊत यांनी ठेवली आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल संवाद साधला, यात ते महाविकासआघाडीमधून बाहेर पडण्याबाबत काहीही बोलले नाहीत, मग 20 तासांमध्ये अचानक असं काय झालं? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना पडला आहे. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना ही ऑफर दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या ऑफरनंतर सोशल मीडियावर फिरत असलेल्या कॉन्सपिरसी थिअरी खऱ्या आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. शिवसेनेच्या एक्झिट प्लानची कन्सपिरसी थेअरी - एकनाथ शिंदे एवढ्या मोठ्या प्रमाणावार आमदार कसे फोडू शकतात? - एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 80 टक्क्यांपेक्षा जास्त आमदार मातोश्रीला थेट आव्हान कसं देऊ शकतात? - शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष संपली आहेत, जो फॉर्म्युला 2019 ला भाजपला दिला आहे. - एकीकडे चौकशीचा ससेमिरा, तसंच लोकसभा आणि विधानसभेत शिवसेनेचा थेट राष्ट्रवादीशी होणारा सामना टाळता येऊ शकतो. - महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. या निवडणुकीत भाजपसोबत थेट सामना झाला आणि मुंबई महापालिकेतली सत्ता जाण्याची भीती?
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Sanjay raut, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या