Home /News /maharashtra /

गृहमंत्र्यांच्याच मतदारसंघात खोटे गुन्हे दाखल झाल्याने राऊतांची नाराजी, शरद पवारांना भेटणार!

गृहमंत्र्यांच्याच मतदारसंघात खोटे गुन्हे दाखल झाल्याने राऊतांची नाराजी, शरद पवारांना भेटणार!

शिरुरमध्ये संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होत असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं.

शिरुर, 05 सप्टेंबर : 'गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्या मतदार संघातील पोलीस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे दाखल ( filing of false police cases) झाले आहेत. सरकार आपलं असताना पाण्यासाठी खोटे गुन्हे दाखल होत असतील तर ही गोष्ट गंभीर' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच, दिलीप वळसे पाटील आणि शरद पवारांशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं. पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये (shirur) शिवसैनिकांचा मेळावा पार पडला.यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होत असलेल्या प्रसंगावर भाष्य केलं. NEET Exam 2021: विद्यार्थ्यांनो , 'या' तारखेला जारी होणार Admit Card 'पुण्यातील शिरुर तालुक्यात पाण्याचा गंभीर प्रश्न असताना या पाणी प्रश्नावर लढणाऱ्यांवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदार संघातील पोलीस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. सरकार जरी आपले असेल तरी आपले प्रश्न मात्र तेच आहेत' अशी नाराजी राऊत यांनी व्यक्त केली. ‘कोणी इतकं सुंदर कसं...’ कतरिनाच्या Latest फोटोंवर चाहत्यांच्या अफलातून कमेंट्स कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होतात. आधी म्हणायचो आपलं सरकार येऊ दे मग खोटे गुन्हे दाखल होत असेल तर मग पाहावू. जर सरकार आपलं असेल आणि पाण्यासाठी खोटे गुन्हे दाखल होत असतील तर ही गोष्ट गंभीर असून मी या विषयावर शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलेन, असं आश्वासन देत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या