मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आदित्य ठाकरे यांच्या वाहनावरील हल्ल्यानंतर राऊत आक्रमक; मुख्यमंत्र्यांना सुनावलं

आदित्य ठाकरे यांच्या वाहनावरील हल्ल्यानंतर राऊत आक्रमक; मुख्यमंत्र्यांना सुनावलं

संजय राऊत

संजय राऊत

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 फेब्रुवारी :  ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सुरक्षेमध्ये करण्यात आलेल्या कपातीवरून त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.  आमच्या सुरक्षा बाबतीत सरकारने घेतलेली भूमिका घृणास्पद आणि धक्कादायक आहे. आदित्य ठाकरे प्रमुख नेते आहेत, त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. अचानक सुरक्षा काढून घेता, नको त्यांना देता, आदित्य ठाकरे  यांच्या वाहनावर झालेला हल्ला दुर्दैवी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिंदेंना टोला

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना वरळीमधून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावरून देखील संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कुठेही सभा घेण्याची मुभा असते, पण त्या व्यक्तीने पदाच्या भूमिकेत जावं लागतं. त्या भूमिकेत न जाता काम केल्यास पचका होतो. जनता सगळ पहात असते, ती पाठ फिरवते तेव्हा खुर्च्या उचलायची वेळ येते असा जोरदार टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

हेही वाचा : चिंचवडमधील तीनही उमेदवार कोट्यधीश; भाजपच्या अश्विनी जगताप आहेत तब्बल 'इतक्या' कोटींच्या मालकीण 

थोरात, पटोले वादावर प्रतिक्रिया  

दरम्यान सध्या काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या पटोले, थोरात वादावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या नसानसात काँग्रेस आहे, हा वाद त्यांच्या पक्षातील आहे, काँग्रेस महाविकास आघाडीमधील महत्त्वाचा पक्ष आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

First published: