मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...तेव्हा अजितदादा भाजपसोबत गेले होते त्यामागे शरद पवारांचा हात नव्हता, संजय राऊतांचा खुलासा

...तेव्हा अजितदादा भाजपसोबत गेले होते त्यामागे शरद पवारांचा हात नव्हता, संजय राऊतांचा खुलासा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे

  • Published by:  sachin Salve

नाशिक, 25 जानेवारी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होणे हा काळाने घेतलेला सूड आहे, असा घणाघात राऊत यांनी केला. तसंच अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी घेण्यावरही मोठा खुलासा केला आहे.

नाशिकमध्ये ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने महाकवी कालिदास कला मंदिरात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची  मुलाखतकार राजू परूळेकर प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत संजय राऊत यांची चौफेर तोफ धडाडली.  यावेळी त्यांनी आपल्या शैलीत भाजपवर सडकून टीका केली.

जेव्हा महाविकासआघाडीची चर्चा सुरू होती. अचानक मी लिलावतीत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालो. पण चर्चा कुठे  फिस्कटणार नाही याची मला खात्री होती. ज्यांच्या  44 आणि 56 जागा आहे ते कधी सत्तेत आले असते का? काँग्रेसला तर सत्तेत येऊ असं स्वप्नही पडलं नसेल. पण, आम्ही एकत्र आलो आणि सत्ता स्थापन केली. पण, त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना घेऊन खेळी केली. पण, अजित पवारांचा शपथविधी हा अक्सिडेंटल शपथ ग्रहण होता. त्या रात्री राज्यपाल झोपलेच नव्हते. राजभवन उघडं होतं आणि भल्या पहाटे फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची गुपचूप शपथ घेतली. पण याचा मला धक्का बसला नाही. अजित पवार परत येतील ही माझी प्रतिक्रिया होती. अजित पवारांनी जे केलं त्याच्यामागे शरद पवार यांचा त्यात हात नव्हता, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

सरकारी यंत्रणा वापरून विरोधी पक्ष टिकू देणार नाही. ही आपल्या देशाची परंपरा नाही.   मंत्रालय हे लोकांसाठी, षडयंत्र करण्याचं कारस्थान करणारा अड्डा नाही. फडणवीस विरोधी पक्षनेते हा काळाने घेतलेला सूड आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

तसंच,  काँग्रेस पक्ष म्हणजेच स्वातंत्र्याची चळवळ आहे. गांधी घराण्याच्या त्यागाच्या आसपास आज एकही कुटुंब जाऊ शकत नाही. गांधी कुटुंबावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करणं शोभत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टोलेजंग नेते आहे. परंतु, गांधी घराण्यावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे, अशी टीकाही राऊत यांनी भाजपवर केली.

संजय राऊतांच्या मुलाखतीमधील मुद्दे

- महाराष्ट्र भाजपच्या हातातून जाणं हाच भाजपला मोठा धक्का

- मुंबईची लूट करून राज्य चालवायचे

- महाराष्ट्र हातात नसणं म्हणजे देश हातात नसणं

- 2022 साली याव्हे5देशात परिणाम त्यांना जाणवेल

- नरेंद्र मोदी आधी गुजरात मुख्यमंत्री मग देशात प्रधानमंत्री

- हा बदल लक्षात घ्या

- पवार साहेबांनी देशाचं नेतृत्व घ्यावं,आम्ही मदत करू

-- राज्य सरकारशी चर्चा न करता भीमा कोरेगाव तपास केंद्रानं घेतला हे दबावतंत्र किंवा काही लपवायचं असेल

- मात्र महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय

- ममतानं वातावरण निर्माण केलं

- मला सामना सोडायचा नाही

- सामना हे सगळ्यात शक्तिमान केंद्र

- टीका करणाऱ्याला नष्ट करा ही आजची वृत्ती

- शरद पवार हे देशाचे नेते

- संकटकाळी अनेक नेते त्यांच्याकडे जातात

- संकटकाळी अनेक नेते त्यांच्याकडे जातात

- हे सरकार 5 वर्ष टीकणार आणि मी पुन्हा येईन हे न सांगता परत येईल

- मी ठरवून काही करत नाही

- पंतप्रधान म्हणून मराठी माणूस बसावा ही इच्छा

- याकरीता महाराष्ट्रानं पवार साहेबांच्या मागे उभे राहावं

- मी काही बोललो तर त्यांना (भाजपला) महत्व मिळतं

- माझं आणि उद्धव ठाकरे यांचं ठरलंय की त्यांना महत्व द्यायचं नाही

 

First published:

Tags: Ajit pawar, Congress, NCP, Sanjay raut, Sharad pawar, Shivsena