मुंबई, 8 मार्च : 'विधीमंडळ नव्हे चोर मंडळ' असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे संजय राऊत चांगलेच अडचणीमध्ये आले आहेत. विधीमंडळाकडून संजय राऊत यांना या वक्तव्याप्रकरणी हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र अद्यापही संजय राऊत यांनी या नोटीसीला उत्तर दिलेलं नाही. आता संजय राऊत यांनी विधीमंडळाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये हक्कभंग नोटीसीवर स्पष्टीकरण देण्यासाठी अधिकच्या वेळीची मागणी करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सध्या विधीमंडळ कार्यालयाकडून राऊतांच्या पत्रावर विचारविनिमय सुरू आहे. थोड्याचवेळात विधीमंडळ कार्यालय आपला निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे राऊतांना मुदतवाढ मिळणार की थेट शिक्षा सुनावली जाणार याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?
महोदय, मी मुंबईच्याबाहेर असताना या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. हे वक्तव्य विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरता केलं नसून, हे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतं होतं. विधीमंडळाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी राज्यसभेचा सदस्य आहे, मी विधीमंडळाचा आदर करतो. मला तीन मार्चपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र मी कोल्हापूर दौऱ्यावर असल्यानं उत्तर देऊ शकलो नाही. मला सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी वेळ दिला जावा असं या पत्रात राऊत यांनी म्हटलं आहे.
हक्कभंग प्रकरणात राऊतांच्या अडचणीत वाढ; आता कारवाईचा चेंडू केंद्राच्या कोर्टात?
काय आहे प्रकरण?
संजय राऊत यांनी 'विधीमंडळ नव्हे चोर मंडळ' असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षातील आमदार चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी राऊतांविरोधात हक्कभंगाचा प्रस्तावर आणावा अशी मागणी केली होती. तर संजय राऊत यांचं वक्तव्य तपासण्यात यांवं ते चुकीचं बोलले असतीत तर कारवाई व्हावी अशी भूमिका महाविकास आघाडीतील आमदारांनी घेतली होती. अखेर या प्रकरणात एका समितीची स्थापना करून राऊत यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut, Shiv sena