संजय राऊतांनी राज्यपालांना दिलं थेट ओपन चॅलेंज, महाविकासआघाडीची सर्वात मोठी बातमी!

संजय राऊतांनी राज्यपालांना दिलं थेट ओपन चॅलेंज, महाविकासआघाडीची सर्वात मोठी बातमी!

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र येऊन आज शक्तिप्रदर्शन करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : राज्यात सत्ता संघर्षाचं शिगेला पोहोचलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या सर्व 162 आमदारांना एकत्र घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. सेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबद्दल टि्वट करून माहिती दिली आहे.

'शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र येऊन आज शक्तिप्रदर्शन करणार आहे. यावेळी तीनही पक्षांचे आमदार, समर्थक पक्ष आणि अपक्ष आमदारही उपस्थित राहणार आहे. महाआघाडीचे १६२ आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेड होणार आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये संध्याकाळी ७ वाजता हे शक्तीप्रदर्शन होणार आहे.

दरम्यान, आज सकाळीच महाविकास आघाडीचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, विनायक राऊत हे राजभवनात दाखल झाले. या नेत्यांकडून महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याचं पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे.

दुसरीकडे, विद्यमान सरकारला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवा डाव टाकला आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या मदतीने भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं. मात्र आता अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण शिवसेनेच्या 56, राष्ट्रवादीच्या 50 आणि काँग्रेसच्या 44 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे फडणवीस सरकारसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

अजित पवारांची मनधरणी सुरूच

अजित पवारांसोबत गेलेले एक एक आमदार आता राष्ट्रवादीत परत आले आहे. अजित पवारांची गटनेतेपदावरून आधीच हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, अजितदादांनी पक्षात परत यावं यासाठी जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी भेट घेतली. जवळपास 3 तास तिन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू होती.

भाजपचाही 170 आमदारांचा दावा

170 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा भाजपने केला आहे. सध्या भाजपकडे असलेल्या संख्याबळाचा विचार करता 105 भाजपचे आमदार 18 अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. आता 145 बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला आणखी 25 आमदारांची आवश्यकता आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राकांपाने 162 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. दोन्ही पक्षांनी केलेल्या दाव्याची संख्या आणि एकूण विधासनभेचे सदस्य यांच्यात ताळमेळ लागत नसल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे विधानसभा अध्याक्षाची निवड होतानाच खरं काय ते समोर येऊ शकेल, असंही विश्लेषक सांगतात.

Published by: sachin Salve
First published: November 25, 2019, 5:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading