मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Phone Tapping Case: संजय राऊत, एकनाथ खडसे, नाना पटोलेंच्या फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

Phone Tapping Case: संजय राऊत, एकनाथ खडसे, नाना पटोलेंच्या फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

संजय राऊत, एकनाथ खडसे, नाना पटोलेंच्या फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

संजय राऊत, एकनाथ खडसे, नाना पटोलेंच्या फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

Sanjay Raut on Phone Tapping case: नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 20 एप्रिल : राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात (Phone tapping case) आता आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती की, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा तब्बल 60 दिवस फोन टॅप करण्यात आला होता तर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा 67 दिवस फोन टॅप करण्यात आला होता. त्याननंतर आता या नेत्यांचे फोन समाजविघातक घटक नावाखाली टॅप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं, सर्वांना अ‍ॅन्टी सोशल एलिमेंट्स सांगून, सर्व खोटं सांगत फोन टॅप करण्यात आले. कुणाला ड्रग्ज पेडलर, कुणाला गँगस्टर म्हटलं गेलं. आमच्यावर नजर ठेवली जात होती. नवं सरकार स्थापन करणअयाच्या संदर्भात आम्ही कोणासोबत बोलत आहोत हे त्यावेळी सुरू होतं. आमची प्रायव्हसी भंग झाली. एक पोलीस अधिकारी ज्यांच्याकडून निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा करतो. ते एका राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्याच्या प्रति प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी हे करत आहे. आता त्यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवत आहे.

वाचा : राज ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात विरोध,औरंगाबादेत 'राज'गर्जना होणार की नाही?

संजय राऊत पुढे म्हणाले, एकनाथ खडसे, मी स्वत:, नाना पटोले... आमचे फोन नंबर तेच आहेत. पण आमच्या नावासमोर जे नाव टाकली आहेत त्यात कुणी ड्रग्ज पेडलर, कुणी गुंडांची टोळी चालवत आहे अशा प्रकारची नावं टाकून फोन टॅप करण्याची परवानगी रश्मी शुक्ला यांनी मागितली होती.

2019 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना आमच्यावर पाळत ठेवली जात होती. तेव्हाच्या अधिकारी रश्मी शुक्ला या केंद्राच्या सेवेत होत्या. भाजपचे नेते रश्मी शुक्ला सारख्यांना पाठबळ देत आहे ते अत्यंत चुकीचं आहे असंही संजय राऊत म्हणाले.

नाना पटोले, बच्चू कडूंचा सुद्धा झाला फोन टॅप

याआधाही राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पहिल्यांदाच कुणा-कुणाचे फोन टॅप झाले होते, याची माहिती जाहीर केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा अमजद खान नावाने फोन टॅप करण्यात आल्याचे वळसेंनी सांगितलं होते.

'रश्मी शुक्ला पुण्याच्या आयुक्त असताना काही राजकीय लोकांचे फोन टॅप केले होते. रश्मी शुक्ला यांनी योग्य ती प्रक्रिया न फॉलो करता फोन टॅपिंग केलं होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती पाटील यांनी दिली.

First published:

Tags: Eknath khadse, Maharashtra News, Nana Patole, Sanjay raut