मुंबई, 29 डिसेंबर : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला टोला लगावला आहे. रेशीमबागला जाणं चुकीचं नाही, हिंदुत्त्ववादी विचारांची संघटना आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जोड्यानं जात असतील तर आनंद आहे. काही दिवसांनी ते सभागृहात खाकी पॅन्ट घालून आले तरी मी त्यांचं स्वागत करेल, असा खोचक टोला राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
कार्यालय सील झाल्यानं राऊत आक्रमक
दरम्यान दुसरीकडे आज आयुक्तांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेतील सर्वच पक्षाची कार्यालय सील करण्यात आली आहेत. यावरून देखील संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना कार्यालयात घुसखोरी होत आहे. शिवसेनेच्या कार्यालयामध्ये घुसखोरांची एक टोळी घुसली आहे. मनपा कार्यालय कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या नियमानं सील केलं? असा सवाल करतानाच हा लोकशाहीचा खून असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा : घुसखोरांची टोळी शिरली त्यांना...; मनपातील कार्यालय सील झाल्यानंतर राऊत आक्रमक
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आक्रमक
मुंबई महापालिकेत काल कार्यालयाच्या ताब्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला होता. दोन्ही गट आमने-सामने आले होते. त्यानंतर आज आयुक्तांच्या आदेशाने महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालयं सील करण्यात आली आहेत. यावरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. कार्यालय पुन्हा सुरू करावेत अशी मागणी ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. कार्यालय सील झाल्यानं माजी नगरसेवकांकडून आंदोलन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath Shinde, RSS, Sanjay raut, Shiv sena