मुंबई, 5 फेब्रुवारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना फोन करून पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केलेला नाही. यावरून आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखण्यासारखे आहेत, मात्र महाराष्ट्राचं राजकारण कोणी गढूळ केलं हे लक्षात घ्यायला हवं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं संजय राऊत यांनी?
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखण्यासारखे आहेत. मात्र महाराष्ट्राचं राजकारण कोणी गढूळ गेलं हे ही लक्षात घ्यायला हवं. देवेंद्र फडणवीस यांनीही हे मान्य करून वातावरण चांगलं होण्यासाठी पुढाकार घेणार असं म्हटलं होतं. मात्र पुढे तसे कोणतेही प्रयत्न का झाले नाहीत असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना इच्छूक
पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, भाजप आणि काँग्रेसनं कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना इच्छूक आहे. कसबा काँग्रेस लढणार हे आधीच ठरलं होतं. या दोन्ही जागांसाठी भाजपला वातावरण अनुकूल नसल्याचं दिसत आहे. विधान परिषद निवडणुकांमध्ये ते स्पष्टही झालं आहे. शिक्षक आणि पदवीधरचा कैल महाविकास आघाडीला राहिला आहे. कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक व्हावी ही लोकांची इच्छा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या फोनवर प्रतिक्रिया
दरम्यान त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या फोनवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. कसबा आणि चिंचवड निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांना फोन केला आहे. मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला नाही. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, बिनविरोध निवडणुका व्हाव्यात यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला नाही, आणि येण्याची शक्यता देखील नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath Shinde, Sanjay raut, Shiv sena, Uddhav Thackeray