Home /News /maharashtra /

Sanjay Raut : मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यासारखी बंडखोरांसाठी पोलिसांची यंत्रणा तैणात संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यासारखी बंडखोरांसाठी पोलिसांची यंत्रणा तैणात संजय राऊतांचा हल्लाबोल

राज्याची जनता सरकारला मान्य करणार नाही, आम्ही जनतेसाठी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या नेतृत्वात झोकून काम करणार असल्याचे संजय राऊत म्हणाले

  मुंबई, 03 जुलै : राज्याची जनता सरकारला मान्य करणार नाही, आम्ही जनतेसाठी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या नेतृत्वात झोकून काम करणार आहे पुन्हा शिवसेनेला (shiv sena) उभारी देण्याचे काम करणार आहे. देशात भाजपने (bjp) 9 सरकार पाडले परंतु आमची देशातील सगळे विरोध पक्षांची नेहमी चर्चा असते यामुळे देशात भाजपला रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी दिली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा गैरवापर काल झाल्याचे दिसून आल्याचेही ते म्हणाले. (sanjay raut criticize bjp over shiv sena rebel mlas)

  दरम्यान काल राज्यात मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यासारखी पोलिस यंत्रणा तैणात करण्यात आली होती. यातून भाजप सत्तेचा कसा गैरवापर करत आहे दिसून आले आहे. देशात भाजप फोडा आणि सरकार स्थापन करा ही निती वापरत आहे त्याला आम्ही देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येत लढा देण्याचे काम करणार आहोत. असे राऊत म्हणाले.

  हे ही वाचा : शिवसेना पक्ष आमचाच, एकनाथ शिंदे गटानेही बजावला व्हीप, गटनेतेपदी शिंदेच!

  एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आम्हीच शिवसेना म्हणून व्हिप जारी केला आहे यावर राऊत म्हणाले की शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. शिवसेना आणि ठाकरे वेगळी होऊ शकत नसल्याचेही ते म्हणाले. शिंदे यांची शिवसेना गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान शिवसेनेचे विधानभवनातील ऑफिस बंद करण्यात आल्याचे मला समजले भाजप सुडाचे राजकारण करत आहे. याचबरोबर आरे कारशेड प्रकरणी सरकार राजकारण करत असल्याचे राऊत म्हणाले.

  राहूल नार्वेकर की राजन साळवी

  विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक थोड्याच वेळात पार पडणार आहे. शिवसेनेनं आपल्या सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटानेही व्हीप बजावला आहे. शिवसेनेच्या लेटर पॅडवर हा व्हीप बजावला असून यामध्ये राहुल नार्वेकर यांना विजयी करा असा आदेश काढला आहे.

  हे ही वाचा : शिवसेनेची मोठी खेळी, शिंदे गट विधानभवनात पोहोचण्याआधीच कार्यालयाचे 'दार' केले बंद!

  शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. आता पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ शिंदे हे विधानभवनात आमनेसामने येणार आहे. राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आधीच व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही व्हीप बजावला आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Sanjay Raut (Politician), Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या