मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संजय राऊतांना अटक आणि जामीन, ईडीच्या कारवाईवर पहिल्यांदाच बोलले अमित शाह

संजय राऊतांना अटक आणि जामीन, ईडीच्या कारवाईवर पहिल्यांदाच बोलले अमित शाह

शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली ईडीने अटक केली, यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

गांधीनगर, 14 नोव्हेंबर : शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली ईडीने अटक केली होती. 100 दिवसांपेक्षा जास्त काळ संजय राऊत हे आर्थर रोड जेलमध्ये राहिले, यानंतर पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांची सुटका केली. संजय राऊत यांची सुटका करतानाच पीएमएलए कोर्टाने ईडीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत कोर्टाने ईडीला फटकारलं.

संजय राऊत आणि प्रविण राऊत यांची अटक बेकायदेशीर आहे, असं मत न्यायलयाने नोंदवलं आहे, तसंच ईडीने आपल्या मर्जीतील आरोपी निवडले. मुख्य आरोपी असलेल्या राकेश सारंग, एचडीआयएल, म्हाडा आणि सरकारी अधिकाऱ्यांना ईडीने अटक केली नाही, असंही कोर्टाने त्यांच्या कॉपीमध्ये म्हणलं आहे. ईडीने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचंही परखड मतही न्यायालयाने मांडलं आहे.

संजय राऊत यांच्यावरची कारवाई आणि त्यावर कोर्टाने ओढलेले ताशेरे याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'न्यूज 18 इंडिया'चा विशेष कार्यक्रम 'गुजरात अधिवेशन'मध्ये Network18 चे एमडी आणि ग्रुप एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांनी ईडीच्या कारवायांबाबत अमित शाह यांना प्रश्न विचारला.

काय म्हणाले अमित शाह?

'देशात न्यायालयीन व्यवस्था आहे. संजय राऊत यांच्याबाबतच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल आहे, त्यासाठी थांबलं पाहिजे. लिगल पोजिशन काय आहे, ते मला माहिती नाही. आमच्या सरकारच्या काळात ज्या केस बनतात, त्या कोर्टात टिकतात. मेरिटच्या आधारावर केस बनतात,' असं उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे.

First published:

Tags: Amit Shah, Sanjay raut