पवार - सोनिया भेटीनंतर शिवसेना बॅकफूटवर; संजय राउतांनी दिली पहिली प्रतिक्रिया

पवार - सोनिया भेटीनंतर शिवसेना बॅकफूटवर; संजय राउतांनी दिली पहिली प्रतिक्रिया

शरद पवार - सोनिया गांधी भेटीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. त्याबद्दल विचारलं असता संजय राऊत काय म्हणालेत पाहा...

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : शिवसेनेबरोबर सरकारस्थापनेबद्दल अजून आमची चर्चाच झालेली नाही, असं शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याबरोबरच्या भेटीनंतर सांगितलं आणि सरकारस्थापनेविषयीचा संभ्रम आणखी वाढला. शरद पवार - सोनिया गांधी भेटीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. त्याबद्दल विचारलं असता संजय राऊत यांनी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पवार यांच्याकडे गेलो होतो, असं सांगितलं. सरकार स्थापनेबद्दल काँग्रेस -राष्ट्रवादीने अद्याप काहीच भूमिका जाहीर केलेली नाही, याबद्दल विचारलं असता, राऊत यांनी थेट प्रतिक्रिया द्यायचं टाळलं. "शरद पवार यासंदर्भात काही बोलले असतील, तर त्यांना कसं काउंटर करायचं", असं ते म्हणाले. शिवसेनेचाच मुख्यमंत्री हे मात्र त्यांनी पुन्हा एकदा ठासून सांगितलं. पवार यांनी सोनियांशी शिवसेनेविषयी चर्चा केली नसेल तरी मी त्यांना कसा प्रश्न विचारू? असं ते म्हणाले.

"सरकार स्थापनेची जबाबदारी आमची नाही. ज्यांची होती, ते जबाबदारीपासून पळून गेले. पण आम्हाला खात्री आहे, आम्ही लवकरच सरकार स्थापन करू", असं राऊत म्हणाले.

वाचा - सोनिया -पवार भेटीनंतर संभ्रम वाढला; शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतले 10 मुद्दे

शरद पवार यांना त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले "महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आहे. ती लवकरात लवकर जाऊन सरकार यावं याबाबत आमचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत आहे." शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपण पवारांना भेटलो, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. राज्यातले प्रश्न महत्त्वाचे आहेत. आता राष्ट्रपती राजवट असल्याने त्यासंदर्भात पंतप्रधानांना भेटणं आवश्यक आहे. सर्व पक्षीय शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घ्यावी का याविषयी चर्चा करण्यासाठी पवारांना भेटलो, असं राऊत म्हणाले.

वाचा - शिवसेनेचं खासदारांना नवं फर्मान, भाजपविरोधात न बोलण्याची ताकीद!

सरकारस्थापनेसाठी किमान समान कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली नसल्याचं पवार म्हणाले होते, त्याविषयी राऊत यांना विचारलं असता,  "तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकर मिळतील", असं वक्तव्य राऊत यांनी केलं.

शिवसेनेला धक्का?

शिवसेनेला पाठिंबा देणार किंवा नाही याबाबत पवार यांनी कुठलंच थेट भाष्य करायचं टाळलं. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच सुटण्याऐवजी आणखी चिघळला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या दिल्लीतल्या भेटीकडे आज महाराष्ट्राची नजर होती. राज्यात सरकार स्थापन होणार का, कधी होणार, कुणाचं होणार, शिवसेनेला साथ द्यायला काँग्रेस - राष्ट्रवादी तयार आहेत का,  या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भेटीनंतर मिळतील अशी अपेक्षा होती. पण सत्तास्थापनेचा पेच सुटण्यापेक्षा अधिकच वाढला आहे. सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी आमची फक्त राजकीय परिस्थितीविषयी आपसांत चर्चा झाली असल्याची माहिती पवारांनी दिली. शिवसेनेविषयी आमच्यात काहीच चर्चा झाली नाही, असं शरद पवार म्हणाले.

---------------------------------------------

अन्य बातम्या

मंदीवर तोडगा काढण्यासाठी मनमोहन सिंग यांचा पुढाकार, मोदी सरकारला दिला हा सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कौतुकावर काय म्हणाले शरद पवार?

मॉब लिंचिंगमध्ये व्यक्तीचा झाला होता मृत्यू, श्राद्ध घातल्यानंतर जिवंत आला घरी!

First Published: Nov 18, 2019 09:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading