Home /News /maharashtra /

'माझ्या समाजाची आणि कुटुंबाची बदनामी करू नका' संजय राठोड अखेर बोलले

'माझ्या समाजाची आणि कुटुंबाची बदनामी करू नका' संजय राठोड अखेर बोलले

पूजा चव्हाण प्रकरणी गेल्या १५ दिवसांपासून गायब असलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड अखेर समोर आले आहे.

    वाशिम, 23 फेब्रुवारी : पूजा चव्हाण प्रकरणी गेल्या १५ दिवसांपासून गायब असलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड अखेर समोर आले आहे. 'पूजा चव्हाण प्रकरणी राज्यात अत्यंत घाणरेडे राजकारण करण्यात आले आहे. माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. माझ्या समाजाची आणि कुटुंबाची बदनामी करू नका' अशी प्रतिक्रिया राठोड यांनी दिली. संजय राठोड यांनी  पोहरादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन संजय राठोड यांनी आपली भूमिका मांडली. 'पूजा चव्हाण ही बंजारा समाजाची मुलगी होती. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झाले आहे. आम्ही सगळे चव्हाण कुटुंबाच्या दुखात सहभागी आहोत. या प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत घाणरेडे राजकारण करण्यात आले आहे. मी गेल्या ३० वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय आयुष्यात आहे, माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार पाहण्यास मिळाला आहे. प्रसारमाध्यमातून जे काही दाखवण्यात आले होते. त्यामध्ये काहीही तथ्य नाही', असा खुलासा राठोड यांनी केला. 'या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. पोलीस चौकशी सुरू आहे. जे काही सत्य या चौकशीतून समोर येईल, ते सर्वांनी पाहावे', असंही राठोड म्हणाले. 'मी काही १५ दिवस कुठेही गेलो नव्हतो. माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, आई वडील वृद्ध आहे. त्यांच्यासोबत १० दिवस होतो. या काळात मी त्यांच्यासोबत होतो. १० दिवस शासकीय बंगल्यावरून काम पाहिले. अमोल राठोड कोण आहे, हे मला माहिती नाही. माझ्यासोबत सर्वच जण फोटो काढत असतात. पण, एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका', असंही संजय राठोड म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या