नालासोपारा, 06 एप्रिल : पूज चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Case) प्रकरणामुळे वनमंत्रिपदावरून पायउतार झालेले शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि संजय राठोड (Sanjay Rathod) आता पुन्हा एकदा कामाला लागले आहे. संजय राठोड यांनी वसईतून (Vasai) महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी 'माझ्या वाईट काळात मला साथ देणाऱ्या समाजाला मी वाऱ्यावर सोडणार नाही' असं म्हणत भावना व्यक्त केली.
संजय राठोड यांनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नरवीर चिमाजी अप्पांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देवीपाडा तांडा/बंजारा पाडा व घाटीआळी, वसई येथून केली. यावेळी पत्रकार परिषदेत संजय राठोड म्हणाले की 'माझ्या वाईट काळात मला साथ देणाऱ्या समाजाला मी वाऱ्यावर सोडणार नाही. समाजाचे गुरू रामराव महाराज यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी यावेळी माजी मंत्री राठोड यांनी केली आहे.
बाप रे! या तळीरामांचा VIDEO पाहा मग सांगा... महाराष्ट्रात का वाढतोय कोरोना कहर
आज कोरोना आपला रौद्ररूप धारण केल असल्याने अनेक समाज बांधव स्थलांतर करीत आहेत. त्यांनी स्थलांतर करू नये यासाठी त्यांच्या अडी अडचणी जाणून घेवून त्या शासन दरबारी मांडून त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे, त्यासाठी हा महाराष्ट्र दौरा करीत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संजय राठोड यांनी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वसई पूर्वेकडील देवीपाडा येथील तांड्यावर बंजारा समाजाची भेट घेतली. ते तांड्यावर आल्या नंतर पारंपारिक वेशभूषेत महिलांनी आरती ओवाळून स्वागत केलं. वसईच्या देवीपाडा येथील नागरिकांनी बंजारा समाजाचे अनेक लोकं वसईत राहत असून त्यांच्या भागात शौचालयांची दुरवस्था झाली आहे. कोरोनामुळे काम मिळण मुश्कील झाले आहे. त्यामुळे उपासमारीने माझा बांधव होरपळू नये म्हणून मी त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रात फिरणार आहे. त्यांच्या सोबत प्रा.चंद्रकांत काळुराम पवार बंजारा चित्रपट निर्माता व दिग्दर्शक वसई हे उपस्थित होते.
देशातील सॉफ्टवेअर इंजीनिअरची अमेरिकेत गोळी घालून हत्या; कुटुंबावर शोककळा
वसई ही संघर्षाची भूमी आहे. याठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून कामगार वर्ग आलेला आहे.विदर्भ असेल ,खानदेश असेल,मराठवाडा असेल बाकीच्या राज्यातून कामगार वर्ग आलेला आहे. वसईत देवी पाडातांडा वस्ती असून 200 कुटुंब येथे राहतात.
तसेच मधल्या काळात जी काही दुर्घटना झाली. आणि त्याच्यावरून जे काही घाणरेडे राजकारण केलं गेलं त्यामुळे सरकार मधून मी राजीनामा दिला त्यानंतर समाज ज्या पद्धतीन समाज माझ्या पाठीशी उभा राहिला जो विश्वास समाजाने माझ्यावर दाखवला. माझ्या सारखा तांड्यातून आलेला मुलगा एका मंत्रिपदापर्यंत जातो याठिकाणी काम करीत असताना मी आत्तापर्यंत संघर्ष केलेला आहे. मी जरी मंत्री नसलो तरी तुमच्या समस्या विधिमंडळात सतत मांडत राहीन, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.