मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sanjay Rathod in Guwahati : संजय राठोड पत्नीचा शब्द मोडून गाठले गुवाहाटी, पत्नीला बीपीचा त्रास होत असल्याने जे जे रुग्णालयात दाखल

Sanjay Rathod in Guwahati : संजय राठोड पत्नीचा शब्द मोडून गाठले गुवाहाटी, पत्नीला बीपीचा त्रास होत असल्याने जे जे रुग्णालयात दाखल

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या 42 आमदारांचे फोटो (42 mla guwahati) आणि व्हिडिओ समोर आले आहेत, यामध्ये शिवसेनेचे 35 आणि अपक्ष 7 आमदार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या 42 आमदारांचे फोटो (42 mla guwahati) आणि व्हिडिओ समोर आले आहेत, यामध्ये शिवसेनेचे 35 आणि अपक्ष 7 आमदार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या 42 आमदारांचे फोटो (42 mla guwahati) आणि व्हिडिओ समोर आले आहेत, यामध्ये शिवसेनेचे 35 आणि अपक्ष 7 आमदार आहेत.

मुंबई, 23 जून : शिवसेनेत बंड केलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shiv sena) यांनी गुवाहाटीतून (guwahati) जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी त्यांच्यासोबत असलेल्या 42 आमदारांचे फोटो (42 mla guwahati) आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, यामध्ये शिवसेनेचे 35 आणि अपक्ष 7 आमदार आहेत. दरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या संजय राठोड (shiv sena mla sanjay rathod) यांच्या घरात तणाव निर्माण झाला आहे. राठोड यांच्या पत्नींना रुग्णालयात दाखल करण्यात आहे. संजय राठोड यांनी पक्ष सोडू नये अशी शितल राठोड (shital rathod) यांची इच्छा होती. परंतु त्यांचा विरोध पत्करून त्यांनी गुवाहाटी गाठलं आहे.

संजय राठोड यांच्या घरात तणाव निर्माण झाला आहे. राठोड यांच्या पत्नी शितल यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पत्नी शितल राठोड यांना बीपीचा त्रास सुरु झाल्याने जेजे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान गेले काही दिवस संजय राठोड हे घरुन नॉट रिचेबल होते. त्यानंतर एकनाथ शिंदेचा प्रस्ताव घेवून संजय राठोड गेल्याने शितल राठोड यांना धक्का बसला काल दिवसभर संजय राठोड जेजे रुग्णालयात होते आज ते गुवाहाटीसाठी निघाले असल्याचे सांगण्यात आले आहे. संजय राठोड यांनी पक्ष सोडू नये अशी शितल राठोड यांची इच्छा होती. परंतु संजय राठोड यांनी गुवाहाटी गाठल्याने पत्नी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचं गुवाहाटीतून शक्तीप्रदर्शन, 42 मधले सेनेचे किती? स्वतंत्र गटासाठी अजूनही पुरेसे आमदार नाहीतच

एकनाथ शिंदे यांना वेगळा गट स्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या 37 आमदांची गरज आहे, म्हणजेच शिंदे यांना अजून 2 आमदारांची गरज आहे. यातले दादा भुसे (Dada Bhuse) हे गुवाहाटीच्या दिशेने निघाले आहेत, ते संध्याकाळपर्यंत तिथे पोहोचतील असं सांगितलं जात आहे, त्यामुळे शिंदेंना आणखी एका आमदाराची गरज आहे.

हे ही वाचा : पक्ष वाचवण्यासाठी आघाडी सरकार फुटणार? राऊतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नाराज, बोलावली तातडीची बैठक

एकनाथ शिंदेकडून वारंवार भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी याला कधीच समर्थन दिलं नाही. दरम्यान ठाकरेंचे निकटवर्तीय संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी आता बंडखोर आमदारांना 24 तासात परत येण्याचं आवाहन केलं आहे. तुम्ही परत या. सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल. तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. तुमच्या भूमिकेवर विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Eknath Shinde, Sanjay rathod, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)