मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संजय राठोड मंदिरात पोहोचले, समर्थकांवर जोरदार लाठीचार्ज LIVE VIDEO

संजय राठोड मंदिरात पोहोचले, समर्थकांवर जोरदार लाठीचार्ज LIVE VIDEO

 संजय राठोड हे पोहरागड इथं दर्शनासाठी पोहोचले आहे. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी जमलेल्या समर्थकांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला.

संजय राठोड हे पोहरागड इथं दर्शनासाठी पोहोचले आहे. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी जमलेल्या समर्थकांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला.

संजय राठोड हे पोहरागड इथं दर्शनासाठी पोहोचले आहे. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी जमलेल्या समर्थकांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला.

वाशिम, 23 फेब्रुवारी : पूजा चव्हाण प्रकरणामुळे (Pooja Chavhan)   चर्चेत असलेले राज्याचे वन, भूकंप  पुनर्वसन मंत्री संजय राठोड अखेर 15 दिवसांनंतर समोर आले आहे. संजय राठोड हे पोहरागड इथं दर्शनासाठी पोहोचले आहे. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी जमलेल्या समर्थकांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला.

संजय राठोड हे यवतमाळ येथील आपल्या घरीच होते. आज सकाळी 9 वाजता पोहरादेवीच्या दर्शनासाठी निघाले. साधारण 80 किमी अंतरावर असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी संजय राठोड यांच्या सोबत कुटुंबीय व स्थानिक नेतेही आहेत. पोहोरादेवी येथे पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी राठोड यांच्या समर्थकांवर लाठीचार्ज करत जमावाला पांगवले. कोरोना संसर्गामुळे गर्दी होऊ देऊ नका, अशी सूचना पोलीस प्रशासनाकडून वारंवार केली जात होती. पण तरीही समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला.

काय आहे प्रकरण?

बीडमधील पूजा चव्हाण (Pooja Chavan) या 22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येनंतर अख्खं राजकारण ढवळून निघालं आहे.  या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाच्या टीमने  यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या दोघांना सध्या चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

कोण होती पूजा चव्हाण?

पूजा चव्हाण ही बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी आहे. ती एक टीकटॉक स्टार होती. सोशल मीडियावर तिचे बरेच चाहते आहेत. पूजाला तिच्या समाजासाठी मोठं काम करायचं होतं. त्यासाठी पूजा विविध सामाजिक कामांत सहभाग घेत असत. तिला बंजारा समाजाच्या विकासासाठी काहीतरी भरीव कामगिरी करायची होती, ही बाब तिने अनेकदा आपल्या व्हिडीओमधून बोलून दाखवली होती.

 पुण्याला का आली होती?

जग जिंकण्याचं स्वप्न असेल तर जगाची भाषा यायला हवी. आपली इंग्रजी भाषा फारशी चांगली नाही, त्यामुळे या बीडच्या महत्वाकांक्षी पोरीने इंग्रजी शिकण्यासाठी पुणं गाठलं होतं. इंग्रजी आलं तर आपण जग जिंकू आणि आपली छाप पाडू असं तिला वाटायचं. पण पुण्यात आल्यानंतर दोन आठवडेही झाले नसतील तोच तिने मृत्यूला कवठाळलं आहे. तिच्या आत्महत्येनंतर जवळपास 12 ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.

First published:

Tags: Maharashtra, Mumbai, Police, Pooja Chavan, Sanjay rathod