वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) नुकतेच वृत्तमाध्यमांपुढे आले होते. त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करून पोहरादेवी गडावर मीडियाशी संवाद साधला आहे. पण पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड यांचे साधारणतः 8 ते 10 हजार समर्थक जमले होते. मुख्यमंत्र्यांसह राजकीय वर्तुळातून नाराजीचे सूर उमटत असल्याचे दिसून येत आहे.