संजय निरुपम निवडणुकीच्या मैदानात, 'या' जागेचं मिळालं तिकीट

संजय निरुपम निवडणुकीच्या मैदानात, 'या' जागेचं मिळालं तिकीट

  • Share this:

मुंबई, 25 मार्च : काँग्रेस नेते संजय निरुपम लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. पक्षाकडून उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघातून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी (25 मार्च) प्रसिद्धी करण्यात आलेल्या यादीमध्ये संजय निरुपम यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, गुरुदास कामत यांच्या निधनानंतर लगेच संजय निरुपम यांनी उत्तर-पश्चिम येथून तयारी सुरू केली होती.

संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर गच्छंती

एकीकडे काँग्रेसनं संजय निरुपम यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलं, मात्र दुसरीकडे त्यांच्याकडील मुंबई काँग्रेस अध्यक्षपद काढून घेतलं आहे. निरुपम यांना पदापासून दूर करत मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय निरुपम यांना पक्षातूनच मोठा विरोध होत होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. कामत गटासह कृपाशंकर सिंह, नसीम खान, मिलिंद देवरा यांनी निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. 'निरुपम हटाव' ही मागणी गेल्या वर्षाभरापासून सुरू होती. निवडणुकीपूर्वी मुंबई अध्यक्षाची बदली करण्यात येईल याची चर्चा होती. अखेर सोमवारी (25 मार्च) मिलिंद देवरा यांची नियुक्ती करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून निरुपम यांना हटवण्यात आल्याने आणि देवरा यांच्या नियुक्तीने पुन्हा एकदा मुंबई काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यामध्ये मुंबईच्या शहरप्रमुख पदावरून वाद होते. त्यावेळी निरुपम यांनी बाजी मारत मुंबईचं शहर प्रमुखपद पटकावलं. यानंतर गेले काही दिवस लोकसभेच्या जागा वाटपावरूनही दोघांमध्ये वाद सुरू होते.

मुंबई पश्चिमेच्या जागेवरच निवडणूक लढवण्यावर संजय निरुपम अडून बसले. उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते तयार नव्हते. या मतभेदांमुळे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा कदाचित नसेल, असं देवरा News18 शी बोलताना म्हटलं होते. आपण याबद्दल पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना कळवलं आहे.

"मुंबई काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीचं मला वाईट वाटतं आहे. आज अनेक काँग्रेस नेते घरी बसून आहेत. त्यांना का डावललं जात आहे आणि त्यांना आपल्याला वगळलं जात असल्याची भावना का आहे? याविषयी विचारायला हवं", असं देवरा म्हणाले होते.

कोण आहेत मिलिंद देवरा?

मिलिंद देवरा हे माजी खासदार राहिले असून दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडून आले होते. 2004च्या निवडणुकीत निवडून आलेले ते सर्वांत तरुण खासदार होते.काँग्रेसप्रणित सरकारमध्ये ते माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री तसंच जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून कारभार पाहात होते. दिवंगत काँग्रेस नेते मुरली देवरा यांच्यानंतर दक्षिण मुंबई मतदारसंघाची मदार काँग्रेसने मिलिंद यांच्यावर सोपवली होती.

काँग्रेसची दुसरी यादी

महाराष्ट्र, नंदूरबार - के. सी. पडवी

महाराष्ट्र, धुळे - कुणाल रोहिदास पाटील

महाराष्ट्र, वर्धा - चारूलता ठोकस

महाराष्ट्र, यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे

महाराष्ट्र, दक्षिण-मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड

महाराष्ट्र, शिर्डी - भाऊसाहेब कांबळे

महाराष्ट्र, रत्नागिरी - नविनचंद्र बांदिवडेकर

केरळ, अलपुझा - शानिमोल उस्मान

केरळ, अत्तिंगल - अंदर प्रकाश

पहिल्या यादीतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील उमेदवार

नागपूर- नाना पाटोले

गडचिरोली- नामदेव उसेंडी

मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त

दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा

सोलापूर- सुशिलकुमार शिंदे

काँग्रेसची महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं

नागपूर- नाना पाटोले

गडचिरोली- नामदेव मुसंडी

मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त

दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा

सोलापूर- सुशिलकुमार शिंदे

उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे उमेदवार

नगीना- ओमवती देवी जथाव

मुरादाबाद - राज बब्बर

खेरी - जफर अली नकवी

सीतापूर - कैसर जहान

मिसरीख - मंजरी राही

मोहनलालगंज - रामशंकर भार्गव

सुलतानपूर - डाॅ.संजय सिंह

प्रतापगढ - रत्ना सिंह

कानपूर - श्रीप्रकाश जयस्वाल

फतेहपूर - राकेश सचन

बहराइच - सावित्री फुले

संत कबीर नगर - परवेझ खान

बांगसगाव - कुश सौरभ

लालगंज - पंकज मोहन सोनकर

मिर्जापूर - ललितेश पति त्रिपाठी

रॉबर्ट्सगंज - भगवती प्रसाद चौधरी

काँग्रेसची इतर 15 उमेदवारांची पहिली यादी

सोनिया गांधी - रायबरेली, उत्तर प्रदेश

राहुल गांधी - अमेठी, उत्तर प्रदेश

इम्रान मसूद - सहारनपुर, उत्तर प्रदेश

सलीम इकबाल शेरवानी - बदायूं, उत्तर प्रदेश

जितिन प्रसाद - धौरहरा, उत्तर प्रदेश

अन्नू टंडन - उन्नाव, उत्तर प्रदेश

सलमान खुर्शीद - फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश

राजाराम पाल - अकबरपूर, उत्तर प्रदेश

ब्रिज लाल खबरी- जालौन, उत्तर प्रदेश

निर्मल खत्री - फैजाबाद, उत्तर प्रदेश

आर.पी. एन. सिंग - कुशी नगर, उत्तर प्रदेश

राजू परमार - पश्चिम अहमदाबाद, गुजरात

भारतसिंह सोलंकी - आनंद, गुजरात

प्रशांत पटेल - वडोदरा, गुजरात

रणजीत मोहनसिंग रतवा - छोटा उदयपूर, गुजरात

VIDEO : 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले', दानवेंची पुन्हा घसरली जीभ

First published: March 25, 2019, 7:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading