Home /News /maharashtra /

राज ठाकरे का ‘जाणता राजा’, मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' कारण

राज ठाकरे का ‘जाणता राजा’, मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' कारण

चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि अभिनेते संजय नार्वेकर यांनी सांस्कृतिक महाराष्ट्र हा ठराव मांडला

    मुंबई, 22 जानेवारी:राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन आज पार पडलं. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता या अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनामध्ये मनसेनं आपला नवा झेंड्याचं अनावरण केलं. यावेळी राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे  सक्रीय राजकारणात सगभागी झाले. या महाअधिवेशनात चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि अभिनेते संजय नार्वेकर यांनी सांस्कृतिक महाराष्ट्र हा ठराव मांडला. संजय नार्वेकर यांनी राज ठाकरेंसोबतचा अनुभव व्यक्त केला. राज साहेबांनी मध्यमवर्गातून आलेल्या माझ्यासारख्या अनेक कलावंतांना स्वस्त दरात घरं मिळवित म्हणून पाठपुरावा केला. राज साहेब कायम मराठी कलावंताच्या पाठिशी उभे राहिले. मराठी माणसांसाठी लढणारा त्यांची जाणीव असणारा हा जाणता राजा आहे, अशा शब्दात नार्वेकर यांनी राज ठाकरेंना धन्यवाद दिले. या महाअधिवेशनात संजय नार्वेकरांनी कलाकारांच्या हक्कासाठी अनेक मुद्दे मांडले. मराठी चित्रीकरणासाठी एक खिडकी परवानगी कक्ष स्थापन व्हावा, नाट्यगृहांची अवस्था सुधारणे, प्रायोगिक रंगभूमी जोपासणे आणि मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नार्वेकरांनी सांगितले. याशिवाय गडकिल्ले संवर्धनांसाठीही तत्पर असल्याचे यावेळी नार्वेकरांनी ठरावात मांडले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांची  मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. 14 वर्षांनंतर मनसेचा महाअधिवेशन मेळावा होत आहे. या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये पहिल्यांदाच अमित ठाकरेंवर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. '27 वर्षांत पहिल्यांदाच मी जाहीर व्यासपीठावर बोलत आहे. तुम्ही सर्वांनी आज आणि याआधीही मला जे प्रेम दिलं आहे, ते भविष्यातही द्याल, यासाठी मी आई जगदंबाचरणी प्रार्थना करतो,' असं म्हणत अमित ठाकरे यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. तसंच पहिल्याच कार्यक्रमात त्यांनी शिक्षण ठरावही मांडला आहे.अमित ठाकरे यांनी आज महाअधिवेशनामध्ये पहिल्यांदा ठराव मांडला आहे.  गुणवत्तेच्या शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना होण्याची अवश्यकता आहे. लहान मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याबाबत तातडीनं अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.  क्रीडा विद्यापीठ स्थापन होणं अतिशय आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू होणे गरजेचं असल्याचं सांगत अमित ठाकरे यांनी ठराव मांडला आहे. महाराष्ट्राचं राजकारण असो किंवा भारताचं इथे नव्या दमाचे चेहरे तसे फार कमी दिसतात. मात्र याला अपवाद ठाकरे कुटुंब. आपल्या हँडसम आणि राऊडी लूकमुळे सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे फार प्रसिद्ध आहेत. त्यासोबतच आता राजकारणात सक्रिय झाल्यामुळे आदित्य ठाकरेंना टफ फाईट देणार का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Maharashtra, Mumbai, मनसे, राज ठाकरे

    पुढील बातम्या