नवी दिल्ली, 30 मे : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे या सरकारमधील नव्या मंत्रिमंडळाबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. सरकारमधील संभाव्य मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करण्यात आल्याची माहिती आहे. या मंत्र्यांची यादी News18 च्या हाती मिळाली आहे.
नव्या सरकारमध्ये महाराष्ट्रातून काही नेत्यांना संधी देण्यात येणार आहे. यामध्ये अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याही नावाचा समावेश आहे. संजय धोत्रे यांनी अकोल्यातून वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला आहे. तसंच महाराष्ट्रातील भाजपचे एक ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. कारण त्यांनी तब्बल चार वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने मंत्रिपदासाठी फोन केलेल्या नेत्यांमध्ये अनेक जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर काही नवे चेहरेही पाहायला मिळत आहेत.
भाजपकडून कुणाला-कुणाला मिळणार संधी?
दानंद गौडा, अर्जुन राम मेघवाल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले , सुरेश अंगाडी, पीयूष गोयल, बाबूल सुप्रियो, जितेंद्र सिंह, किशन रेड्डी, सुरेश अंगदी, स्मृती इराणी, प्रहलाद जोशी, राजनाथ सिंह, निर्मला सीतारमण, रविशंकर प्रसाद, मुख्तार अब्बास नकवी यांना पंतप्रधान कार्यालयामधून फोन आल्याची माहिती आहे.
VIDEO: मोदींच्या मंत्रिमंडळात रामदास आठवलेंची वर्णी लागणार?