अकोला, 18 जानेवारी : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. विदर्भातील पहिला निकाल हाती आला असून वंचित बहुनज आघाडीने आपलं खातं उघडलं आहे. अकोल्यातील सांगवी खुर्द ग्रामपंचायतीत वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने राज्यभरातील विविध भागांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही वंचित आघाडीने विजयी घोडदौड सुरू केल्याचं दिसत आहे. त्यामुळे आणखी किती ग्रामपंचायतींमध्ये वंचितकडून विजयी फडकावली जाते, हे पाहावं लागेल.
राज्यातला पहिला निकाल, हातकणंगलेमध्ये आमदार विनय कोरेंच्या पॅनेलने मारली बाजी
मतमोजणीचा पहिला कल हाती आला असून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगलेमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे.
हातकणंगले तालुक्यातील पाडळी गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीचा कल हाती आला आहे. यामध्ये आमदार विनय कोरे यांच्या पॅनेलचा विजय झाला आहे.
दरम्यान, 15 जानेवारी रोजी राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय टक्केवारी (कंसात ग्रामपंचायतींची संख्या): ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breaking News, Gram panchayat