पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

बेळगाव जिल्ह्यातील वारकरी कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या 5 वारकऱ्यांवर काळाचा घाला तर 5 जण गंभीर जखमी.

  • Share this:

वीरेंद्र उत्पात (प्रतिनिधी) सांगोला, 08 नोव्हेंबर : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला असून यात 5 जण जागीच ठार झाले आहेत. शुक्रवारी पहाटे चार वाजता सांगोल्या जवळील मांजरी येथे हा अपघात घडला आहे. या घटनेत दोघे जण गंभीर असून इतर जखमींवर सांगोला व पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत. अपघातात ठार झालेले सर्व वारकरी बेळगाव जिल्ह्यातील आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगाव जिल्ह्यातील मांडोळी, हंगरगा इथले वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघाले होते. बोलेरो गाडीने 10 ते 12 वारकरी गुरुवारी रात्री बेळगावमधून निघाले. त्यानंतर पाहटेच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथं ट्रॅक्टरला त्यांच्या वाहनाची धडक बसली. ट्रक्टर आणि बोलेरो यांची धडक इतकी भीषण होती की, या अपघातात चौघांचा जागीच तर एक जण उपचारासाठी नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. मृतांमध्ये हंगरगा येथील एक तर मंडोळी येथील चौघांचा समावेश आहे.

सध्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. वारकऱ्यांच्या अपघाताची बातमी पोहचताच बेळगावातील मंडोळी गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच संबंधितांचे नातेवाईक सांगोल्याकडे रवाना झाले आहेत. अपघातामध्ये आणखी 5 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सांगोल्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वकिलांनी महिला पोलिसावरही केला हल्ला, पाठलाग करून केली मारहाण, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: belgaon
First Published: Nov 8, 2019 09:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading