स्वप्नील एरंडीकर, प्रतिनिधी
सांगली, 2 फेब्रुवारी : सांगलीतील विटा नगरपालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत आणखी एक पाऊल टाकले आहे. शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी विटा नगरपालिकेने पैसे जसे एटीएममधून काढता येतात तसे कापडी पिशव्याचे वेंडिंग मशीन शहरात बसवले आहेत. अगदी पाच रुपयांत चांगल्या दर्जाची पिशवी यामाध्यमातून नागरिकांना मिळत आहेत.
विटा शहरातील ठिकठिकाणी आणि बाजारपेठेत, भाजी मंडई मध्ये कापडी पिशव्या उपलब्ध आणि मिळवून देणारे एटीएम मशीन बसवण्यात आले आहेत. पाच रुपये टाकले की या एटीएम मशीनमधून चांगल्या पद्धतीची कापडी पिशवी मिळते. यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा होणारा वापर कमी होण्यास मदत होणार आहे.
प्लास्टिक पिशव्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत विटेकर जागरूक आहेत. मात्र प्लास्टिक पिशव्यांना पर्याय मिळाल्याशिवाय त्यांचा वापर थांबणार नाही. याचसाठी रास्त दरात कापडी पिशव्या उपलब्ध मिळवून देणारे मशिन बाजारपेठेत बसविण्यात आले आहे. केवळ पाच रुपये इतक्या कमी किमतीमध्ये विटेकरांना कापडी पिशव्या मिळणार आहेत. या मशीनमुळे बाजारपेठेत सर्रास वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होण्यास मदत मिळणार आहे
कापडी पिशव्यांचे एटीएम
विटा पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून पर्यावरण संवर्धन प्रदूषणाला आळा बसावा या उद्देशाने विटा शहराच्या मार्केटमध्ये तसेच भाजी मंडई अशा विविध सार्वजनिक आणि व्यापारी भागात कापडी पिशव्यांची एटीएम मशीन बसवण्यात आली आहेत.
पिकांच्या वाढीला लागणारा महत्त्वाचा घटक महागला, शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलं, Video
नागरिकांचा चांगला प्रतिसाद
प्लास्टिक पिशव्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत नागरिक जागरूक झाले आहेत. पाच रुपये इतक्या कमी किमतीत या एटीएम मशीन मधून पिशव्या मिळत आहेत. यामुळे विटा शहरात प्लास्टिक कचरा मुक्तीची चळवळ जोर धरू लागली आहे .या उपक्रमास नागरिकांचा देखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.