मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Union Budget 2023 : हळद उत्पादक शेतकऱ्यांना खूशखबर मिळेल? काय आहेत व्यापाऱ्यांचे प्रश्न? पाहा Video

Union Budget 2023 : हळद उत्पादक शेतकऱ्यांना खूशखबर मिळेल? काय आहेत व्यापाऱ्यांचे प्रश्न? पाहा Video

X
What

What will turmeric farmers get in the budget

सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेतले जाते. येथील शेतकरी, व्यापाऱ्यांनी त्यांच्यासमोरील प्रश्न मांडले आहेत.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Sangli, India

  सांगली, 28 जानेवारी : 1 फेब्रुवारीला देशाच्या अर्थमंत्री निर्माला सितारामन केंद्रीय अर्थसंकल्प  सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचा सर्वाधिक परिणाम कृषी क्षेत्रावर होतो. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत. सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे येथील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या काय आहेत मागण्या पाहुयात. 

  5 टक्के जीएसटी मधून जर हळदीला मुभा दिली तर शेतकऱ्यांना पाच टक्के फायदा होईल. हळद स्टोरेज करण्यासाठी स्टोरेजची देखील कमतरता आहे. सध्या जे स्टोरेज आहेत त्या स्टोरेजचे भाडं हे व्यापाऱ्यांना परवडणारे नाही. तरी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये स्टोरेजच्या दृष्टिकोणातून विचार होण्याची गरज आहे.

  उत्पादन काढण्याचे प्रयत्न 

  महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात वाव आहे. त्यासाठी महत्त्वाच्या बाबींमध्ये सातत्याने विचार होणे गरजेचे आहे. हळदीच्या दरामधील चढउतार, उन्नत जातीच्या लागवडीखालील अपुरे क्षेत्र, सेंद्रिय खतांची कमतरता, मोठ्या प्रमाणात करावा लागणारा मशागत खर्च, नियंत्रित बाजारपेठेचा अभाव, यांत्रिक पद्धतीने काढणी करणे अशा बाबींचा विचार करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहेत. 

  निर्यात वाढवावी

  देशामध्ये  हळदीचा व्यापार फार मोठा नाही. हळद संपूर्ण महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश, तेलंगणा तामिळनाडू या ठिकाणी पिकते. हळदीच्या बाबतीत निर्यातीमध्ये चालना देणे गरजेचे आहे. हळदीचे विविध गुणधर्म आहेत. हळदीचा वापर हा मसाल्यामध्ये खाण्याकरताही आहे. त्यामुळे हळदीची निर्यात वाढवणे आवश्यक आहे.  

  हळदीला भाव नाही

  हळदीला गेले पाच ते सहा वर्षे झाले चांगले दर मिळत नाहीत. त्याला कारण हळदीचे उत्पादन खूप वाढलेला आहे आणि मागणी त्या तुलनेत नाहीये. परंतु निर्यात मात्र वाढायला लागलेली आहे. निर्यात वाढत असताना त्याच्यावर सरकारने लक्ष देऊन त्याच्यावर बऱ्याच गोष्टी संपविण्याची गरज आहे.

  80C ची मुदत संपली तर अजून कोणत्या मार्गाने तुमचा कर वाचवू शकता? Video

  ई वे बिल रद्द करावे

  ई वे बिल काढण्यात व्यापाऱ्यांना त्रास होतो. हळदीचे महाराष्ट्रात ई वे बिल रद्द करावे. शेतकऱ्यांचा माल स्टॉक करण्यासाठी जाताना ई वे बिल रद्द कलं तर त्याचा लाभ शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना होऊ शकतो, अशी मागणी सांगली येथील व्यापारी गोपाळ मर्दा यांनी दिली.

  First published:

  Tags: Budget 2023, Farmer, Local18, Nirmala Sitharaman, Sangli